26 C
Mumbai
Wednesday, November 29, 2023
घरराजकीयशरद पवारांनी रिपाईं फोडली; पडळकरांचा नवा आरोप

शरद पवारांनी रिपाईं फोडली; पडळकरांचा नवा आरोप

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवारांवर वाईट पद्धतीने टीका केली आहे. पडळकरांनी आज बारामतीमध्ये तर काल (१६ ऑक्टोबर) माळशिरसमध्ये शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. गोपीचंद पडळकर यांनी यापूर्वीही अनेकदा शरद पवारांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. गेल्या महिन्यात तर त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांवरही टीका केली होती. पण अजित पवार समर्थकांनी त्यांच्या ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर दिल्यामुळे गोपीचंद पडळकर शांत बसले. त्यातही अजित पवार सत्तेत गेल्यामुळे कदाचित पडळकरांना शांत बसावे लागले असेल. पण पडळकरांनी पुन्हा शरद पवारांना डिवचले आहे, एवढे मात्र नक्की.

आज गोपीचंद पडळकरांनी शरद पवार यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला. बी.के. कोकरे यांच्या धनगर समाजाची चळवळ शरद पवारांनी मोडून टाकली. एवढेच नाही तर शरद पवार फोडाफोडीमध्ये माहीर आहेत. त्यांनी पहिल्यांदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया फोडला. रिपाईंचे तुकडे तुकडे करण्यात शरद पवारांचा मोठा वाटा आहे. ज्यांनी बाबासाहेबांची चळवळ मोडली त्यांना बी.के कोकरे यांच्या धनगरांची चळवळ मोडायला जास्त काळ लागला नाही. धनगर समाजाची ‘एसटी’ची मागणी असताना त्यांचा ‘एनटी’मध्ये समावेश केला. त्यात धनगर समाजाचे मोठे नुकसान झाले. असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

बारामतीच्या भाषणात त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचा STD असा उल्लेख केला. ‘तुम्ही किती दिवस एसटीडीच्या नादात गुरफटणार? एसटीडी म्हणजे साहेब, ताई आणि दादा. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या गुलामगिरीतून बाहेर पडा, एकदिवस तुम्ही राजा व्हाल’. एवढेच कशाला तर त्यांना ‘साहेब, ताई आणि दादा म्हणायचे सोडून द्या’, असा सल्लाही पडळकरांनी दिला.

तत्पूर्वी काल माळशिरसमध्येही गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली होती. तिथे त्यांनी शरद पवारांचं नाव न घेता ‘लांडगा’ असा उल्लेख केला होता. ‘महाराष्ट्रात कुठला लांडगा भांडण लावतो, हे सर्वांना ठावूक आहे’ अशी टीका पडळकरांनी केली. तर गेल्या महिन्यात पडळकरांनी शरद पवार आणि अजित पवारांचा उल्लेख ‘लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू’ असा केला होता.

हे ही वाचा

मराठा आरक्षणावर अजित पवार म्हणाले, ‘दमच निघत नाही’

समलैंगिक विवाहाला ‘सर्वोच्च’ मान्यता नाहीच, संसदीय कायदेमंडळाचा अधिकार

अध्यक्ष नार्वेकरांना पुन्हा ‘सर्वोच्च’ समज; ३० ऑक्टोबरला अखेरची संधी

यावरून आज शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पडळकर हवेत बोलणारे नेते असल्याची पलटवार केला, तर अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी काहीही बोलण्यास नकार देत पडळकरांना अनुल्लेखाने मारले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी