27 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
HomeराजकीयGopichand Padalkar : आमदार गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

Gopichand Padalkar : आमदार गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

टीम लय भारी

सांगली : आमदारपदाची नव्यानेच सूत्रे हाती घेतल्यानंतर गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी मुख्यमंत्र्यांकडे महत्वपूर्ण मागणी केली आहे. सध्या ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. या अनुषंगाने पडळकर यांनी एका महत्वाच्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. 

Gopichand Padalkar
जाहिरात

‘कोरोना’च्या  संकटकाळात सरकारी यंत्रणा काम करीत आहे. पण येत्या महिनाभरात मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी निवृत्त होणार आहेत. हे अधिकारी निवृत्त झाल्यामुळे ‘कोरोना’ची परिस्थिती हाताळण्यात अडचणी उद्भवतील. त्यामुळे येत्या एक – दोन महिन्यांत निवृत्त होणाऱ्या सगळ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आमदार पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी केली आहे.

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे सुद्धा निवृत्त झालेले आहेत. परंतु ‘कोरोना’ची परिस्थिती हाताळण्यात हयगय नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी मेहता यांना सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच पद्धतीने राज्यभरातील निवृत्त होऊ घातलेल्या सगळ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहा महिने मुदतवाढ द्यावी, असे पडळकर ( Gopichand Padalkar ) ‘लय भारी’शी बोलताना म्हणाले.

तहसिलदार, पोलीस निरीक्षक, राजपत्रीत अधिकारी, ‘कोरोना’ परिस्थिती हाताळणारे असे अनेक अधिकारी व कर्मचारी निवृत्त होताहेत. आमच्या एकट्या सांगली परिसरातच जवळपास 60 अधिकारी व कर्मचारी महिनाभरात निवृत्त होणार आहेत.

Dr. Amol Kolhe

निवृत्त होऊ घातलेल्या या अधिकाऱ्यांना कार्यरत असलेल्या भागांची, माणसांची पूर्ण माहिती आहे. ‘कोरोना’ची परिस्थिती ते हाताळत आहेत. पण त्यांच्या निवृत्तीमुळे तिथे नवीन अधिकारी आल्यास त्याला लगेचच प्रभावी काम करता येणार नाही, असे ते ( Gopichand Padalkar ) म्हणाले.

नवीन नियुक्तीचा परिसर समजून घेण्यात नव्या अधिकाऱ्याचे त्याचे काही महिने निघून जातील. त्यामुळे ‘कोरोना’ची परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी व मुख्य सचिवांनी या गंभीर विषयात लक्ष घालावे. अगदी एक – दोन दिवसांतच याबाबतचा तातडीने निर्णय घ्यावा.

निर्णय घ्यायला उशीर झाला तर त्याचा परिणाम ‘कोरोना’ची परिस्थिती हाताळण्यावर होईल. विशेषत: ग्रामीण भागात मुंबई – पुण्यावरून मोठ्या संख्येने लोक येत आहेत. त्यांना कोरन्टाईन करणे, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यावर तालुका प्रशासन काम करीत आहे. पण या ठिकाणी नवीन अधिकारी आल्यास पूर्णतः विस्कळीतपणा येईल, अशी भिती पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी व्यक्त केली.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Gopichand Padalkar MLC : देवेंद्र फडणविसांनी गोपीचंद पडळकरांमधील ‘हे’ गुण हेरले

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांवर टीका केल्याने एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील ठरताहेत धनगर समाजाचे खलनायक

KhadseVsFadanvis : गोपीचंद पडळकरांची उमेदवारी, अन् एकनाथ खडसेंचा तिळपापड

गोपीचंद पडळकरांचा बारामतीमध्ये ट्वेन्टी – 20 सामना

खडसेंच्या टीकेवर गोपीचंद पडळकर म्हणतात..

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी