29 C
Mumbai
Wednesday, September 7, 2022
घरराजकीयAmbadas Danve : सरकारने अंबादास दानवे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे दिले आश्वासन

Ambadas Danve : सरकारने अंबादास दानवे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे दिले आश्वासन

आज सभागृहात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रकर्षाने मांडले. विरोधकांच्या दबावामुळे सरकार नमले असल्याचे समोर आले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमकपणे काही मागण्या मांडल्या.

एक महिन्यांहून अधिक काळ राज्यात मंत्री मंडळ नव्हते. त्यामुळे राज्यांचा गाडा थांबला होता. त्या 40 दिवसांमध्ये राज्यात अनेक समस्या न‍िर्माण झाल्या आहेत. त्यांचे निवारण कसे करावे हा प्रश्नाच सर्वांनाच पडला होता. मात्र आता 18 आमदारांना खाते वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आता जनतेचे प्रश्न मांडणे सोपे होणार आहे. आज सभागृहात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रकर्षाने मांडले. विरोधकांच्या दबावामुळे सरकार नमले असल्याचे समोर आले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमकपणे काही मागण्या मांडल्या. त्यात प्रामुख्याने मराठवाडयातल्या शेती संबंधीत मागण्या होत्या.

विरोधी पक्ष नेते दानवे यांनी मांडलेल्या मागण्यांचा उल्लेख करत विविध घटकांना दिलासा दिला जाईल. अशी घोषणा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवे यांच्या प्रस्तावावर उत्तर देतांना विधान‍ परिषदेमध्ये केली. गेल्या काही दिवसांपासून मराठवाडयातील शेतामध्ये मोठया प्रमाणात गोगलगायींमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच यावर उपाय योजना करतांना, पिकापासून गोगलगायींना बाजूला करतांना काही महिलांचा मृत्यू झाल्याची बाब अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री गोगलगाय आणि अन्य कारणांमुळे नुकसान झाले. ते निकषात बसत नसले, तरी गुलाबी बोंडअळी वेळी जसा वेगळा शासन निर्णय काढून मदत केली, तशाच प्रकारे शासन निर्णय काढून मदत करण्याचा प्रयत्न करु. आशा प्रकारे शासन निर्णय काढून मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

‘Nayyara Noor : भारतात जन्मलेली पाकिस्तानची बुलबुल ‘नय्यारा नूर’ यांचा आवाज हरपला

Jayant Patil : जयंत पाटील यांनी व‍िधानसभा अध्यक्षांवरच डागली तोफ !

Ajit Pawar : फडणवीसांचे म‍ित्र प्रेम,अजित पवारांकडेच ‘देवगिरी’ बंगल्याच्या चाव्या

एनडीआरएफच्या निकषात हे बसत नाही. तरी देखील गोगलगायीच्या प्रादुर्भावाबाबत विशेष बाब म्हणून शासन निर्णय काढून मदत करण्यात येईल. गोगलगायीमुळे महिलांचे मृत्यू झाले असतील तर त्यांची शहनिशा केली जाईल. तसेच अंबादास दानवे यांनी जमीन खरडून गेल्यावर त्या जम‍िनीवर येणाऱ्या पाच वर्षांत पीक येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

त्यावर फडणवीस म्हणाले की, दानवे यांच्या पशुधन पंचनाम्यावर उत्तर देतांना वाहून गेलेल्या पशुधनासंदर्भात कोल्हापूरच्या  धर्तीवर निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अनेक भागात शेतामधील ठिबक स‍िंचन योजनेचे पाईप खराब झाले आहेत. त्यावर देखील विचार करण्या येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी