27 C
Mumbai
Tuesday, March 21, 2023
घरराजकीयआता चिंतन, मनन करायचे आहे म्हणत, राज्यपालांची पदमुक्त करण्याची पंतप्रधानांकडे इच्छा

आता चिंतन, मनन करायचे आहे म्हणत, राज्यपालांची पदमुक्त करण्याची पंतप्रधानांकडे इच्छा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांच्याकडेच पदमुक्तीची इच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी झालेल्या भेटीत आता उर्वरीत जीवन अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा राज्यपालांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे व्यक्त करत राज्यपाल पदावरुन पदमू्क्त करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितल्याचे या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. (Governor Bhagat Singh Koshyari expressed his desire to relieve Prime Minister Modi)

“महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटल्याचे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान यापूर्वी देखील राज्यपालांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना पदमूक्त करण्यासंदर्भात पत्र लिहीले होते. त्यानंतर आता पून्हा त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे राज्यपाल पदावरुन पदमूक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

आता जवळच्या मेडिकलमध्येही लसीकरण होणार सहज शक्य!

पंतप्रधान मोदी यांनी दोन वेळा शिवरायांचा उल्लेख केला, पण राज्यपालांना खडे बोल सुनावले नाहीत!

राज्यपालांकडून पंडीत नेहरूंचा अवमान, अशोक चव्हाणांनी व्यक्त केला संताप

वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेची झोड

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यपालांवर टीकेची झोड उठली होती. विरोधी पक्षांनी देखली राज्यपालांना केंद्राने परत बोलवावे अशी मागणी केली होती. महाविकास आघाडीने मुंबईत मोर्चा काढून राज्यपालांचा निषेध देखील व्यक्त केला होता.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी