29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयराज्यपालांनी बहूमतासाठी अधिवेशन बोलवावे ! कॉंग्रेसची मागणी

राज्यपालांनी बहूमतासाठी अधिवेशन बोलवावे ! कॉंग्रेसची मागणी

टीम लय भारी

मुंबईः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यामुळे राज्यपालांनी बहूमतांसाठी ताबडतोब अधिवेशन बोलवावे अशी मागणी कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे. मात्र, राज्यपाल आणि महाविकास आघाडीकडून या संदर्भात कोणत्याही हालचालींची माहिती समोर आलेली नाही.

केंद्र सरकारने अग्निपथ योजना घोषीत केली. त्यानंतर देशात ठिकठिकाणी याचा निषेध करण्यात आला, जाळपोळ करण्यात आली. जनता रस्त्यावर उतरली. दंगल घडविण्यामागे राहूल गांधीचे कट कारस्थान असल्याचा आरोप भाजपने केला. मात्र, या प्रकरणातून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी या बंडाची योजना आखल्याचा आरोप पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे नेते पटोलेंनी केला आहे.

सरकारने अग्निपथ योजनेच्यामाध्यमातून राजकीय आखाडा तयार केला. मात्र लोकांचा विरोध पाहून सरकार हादरले होते. त्यामुळे केंद्र सरकार या बंडामागे उभे राहिले. केंद्र सरकारने या बंडखोर आमदारांना सुरक्षा पुरवली. जून महिना संपत आला तरी देशात चांगल्या पावसाला सुरुवात झाली नाही. पेरणीचा हंगाम सुरु असतांना राज्यातले आमदार गुवाहटीतआहेत. राज्यातील जनतेला पेरणीसाठी बी बियाणे, खतांची आवश्यकता आहे. राज्याचे कृषीमंत्री देखील त्यांच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे शेतकरी राजा संतप्त झाला आहे. सामान्य जनतेच्या संतापाचा उद्रेक झाला असून या बंडखोरांना शिव्या शाप देत आहेत. या वर्षी बळीराजचा धान आणि चणा घरी पडून आहे. त्याची विक्री अजूनझालेली नाही. त्यामुळे शेतकरी आक्रोश करत आहेत.

केंद्र सरकारने या बंडाला पाठिंबा देत महा बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्यापासून महाराष्ट्राच्या प्रगतीमुळे भाजपला पोट दुखी झालेली आहे. बंडखोर आमदारांना 50 कोटींची देण्यात आले आहेत. यासाठी 3 हजार कोटींहून अधिक खर्च महाशक्ती म्हणजेच भाजप करत आहेत. ही गोष्ट जनतेला माहित झाली आहे. या बंडाला भाजप पाठिंबा देत आहे. त्यामुळे या बंडखोरांबरोबरच भाजप देखील देशात बदनाम होत आहे.

हे सुद्धा वाचा :

उद्धव ठाकरे यांना एका आंबेडकरवाद्याचे पत्र !

नेते पंचतारांकित हॉटेलमध्ये; तर समर्थक रस्त्यावर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी