30 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
HomeराजकीयGujarat Bridge Collapsed : रक्ताचा सडा बघायला येणाऱ्या मोदींसाठी रुग्णालयात रंगरंगोटी! काँग्रेस...

Gujarat Bridge Collapsed : रक्ताचा सडा बघायला येणाऱ्या मोदींसाठी रुग्णालयात रंगरंगोटी! काँग्रेस आक्रमक

मोरबी पुल दुर्घटनेनंतर गुजरात मध्ये शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी गुजरात दौरा करणार आहेत. यामध्ये ते मोरबी सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करणार आहेत, परंतु मोदी येणार म्हणून भाजपकडून वेगळीच पळापळ सुरू झाली आहे.

गुजरात येथील मोरबी पूल (morbi bridge) दुर्घटनेनंतर अवघ्या देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत तब्बल 141 जणांनी जीव गमावला, तर अनेकजण बेपत्ता असून त्यांचा अजूनही यंत्रणांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. या दुर्देवी घटनेमुळे गुजरातमधील वातावरण शोकाकूल झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान या शोकाकूल वातावरणात सुद्धा राजकारणी एकमेकांवर टीका – टिप्पणी करत तुटून पटल्याचे दिसून येत असून राजकीय रंग आणखीच गडद झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुर्घटनेतील आपदग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुजरातमध्ये दाखल होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर भाजपची इव्हेंटबाजी असे म्हणत काॅंग्रेसने टीका केली आहे त्यामुळे या वादाला नवे तोंड फुटले आहे.

मोरबी पुल दुर्घटनेनंतर गुजरात मध्ये शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी गुजरात दौरा करणार आहेत. यामध्ये ते मोरबी सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करणार आहेत, परंतु मोदी येणार म्हणून भाजपकडून वेगळीच पळापळ सुरू झाली आहे. केवळ पंतप्रधान मोदी भेट देणार म्हणून मोरबी रुग्णालयात भिंतींना टाईल्स आणि रंगरंगोटी करण्यात आली आहे आणि हाच मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

यावर काॅंग्रेसपक्षाकडून कडाडून टीका करण्यात आली असून आम आदमी पक्षाने सुद्धा यामध्ये आपली पोळी भाजून घेतली आहे. यावेळी बोलताना काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी हा इव्हेंटबाजीचा प्रकार असल्याचा आरोप केला तर हा फोटोशूटसाठी अट्टाहास सुरु असल्याचे म्हणत आम आदमीकडून कडाडून टीका करण्यात आली. केवळ इतकंच नाही तर मोरबीचे आम आदमी पक्षाचे संभाव्य उमेदवार पंकजभाई राणसरिया यांनी हॉस्पिटलमध्ये जात तेथील तातडीचे  काम बंद पाडले त्यामुळे आणखीच गदारोळ वाढल्याचे दिसून येत आहे.

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष पुन्हा लांबणीवर; न्यायालयाने सांगितली पुढील सुनावणीची तारीख

CM OSD : मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी यांना नक्षलवाद्यांकडून मिळाली धमकी

Beauty Sleep : निवांत झोपेमुळे आता तुमची सुंदरता वाढणार! जाणून घ्या काय आहे ‘ब्युटी स्लीप’

दरम्यान काँग्रेस नेते पवन खेरा यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यामध्ये खेरा म्हणतात, आज रात्री मोरबी रुग्णालयात नवीन भिंतींना नवीन टाईल्स लावल्या जात आहेत, रंगरंगोटी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जखमींची विचारपूस करण्यासाठी येणार असल्याने ही सगळी लगबग सुरु आहे. मोरबीमधील दुर्घटना ही मानवनिर्मीत संकट आहे. आज अनेक घरांमध्ये चुली पेटल्या नाहीत. काही लोकांचे मृतदेह मिळालेले नाहीत, पण इव्हेंटमध्ये कोणतीही कमी राहता कामा नये. काँग्रेस पक्षाने आपली यात्रा आणि कार्यक्रम स्थगित केले. पण पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा एकही कार्यक्रम रद्द केला नाही असे म्हणून त्यांनी यावेळी भाजपला लक्ष केले.

पुढे पवन खेरा म्हणतात, या गुजरातने पंतप्रधान मोदींना कुठून कुठे नेले? अजून अनेकांचे मृतदेह मिळालेले नाहीत, तरी मोदींना इव्हेंट करण्याची एकही संधी सोडायची नाही. पंतप्रधान मोदी एक दिवस इव्हेंट केल्याशिवाय राहू शकत नाहीत का? गुजरात ही महात्मा गांधींची भूमी आहे. याठिकाणी संवेदना पहिली असली पाहिजे. तुम्ही राजधर्म पाळाल ही अपेक्षा आम्हाला नाहीच. फक्त थोडी संवेदना असती तर तुम्ही मोरबी दुर्घटनेचा इव्हेंट नसता केला. तुम्ही तुमचे कार्यक्रम सुरुच ठेवले आहेत. ज्यांच्या घरात दिवे जळाले नाहीत, मृतदेह मिळाले नाहीत, दुखवटा आहे, त्यांच्या काही तरी विचार करा आणि तुम्हाला इव्हेंट करावासा वाटत आहे असे म्हणून भाजपच्या या अजब वागणूकीवर खेरा यांनी खडे बोल सुनावले आहे.

सदर दुर्घटना रविवारी रात्री मोरबी येथे घडला. मोरबी येथील मच्छू नदीवरील झुलता पूल पडल्याने मोठी दुर्घटना घडली. सदर पूल काही दिवसांपूर्वीच पुन्हा नागरिकांसाठी सुरू करण्यात आला होता परंतु पुल जुना असल्याने काही कळायच्या आतच ही मोठी दुर्घटना घडली. या घटनेत 400 हून अधिक लोक नदीत पडले. त्यातील तब्बल 141 जणांचा यात मृत्यू झाला, तर कित्येक जणांचे अद्याप मृतदेह हाती लागलेले नाहीत. सदर दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी तातडीने यावर पावले उचलत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवर चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी