30.4 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरराजकीयगुजरात निवडणुकीच्या निकालानंतर काय म्हणाले शरद पवार, उद्धव ठाकरे?

गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर काय म्हणाले शरद पवार, उद्धव ठाकरे?

गुजरात विधानसभा निवडणुकीत आज भाजपने अभुतपुर्व यश मिळवत सत्तेवर मोहर उमटविली आहे. गुजरात निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत

गुजरात विधानसभा निवडणुकीत आज भाजपने अभुतपुर्व यश मिळवत सत्तेवर मोहर उमटविली आहे. गुजरात निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुजरात निवडणुकीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, गुजरातचा निकालावरुन देशात एकतर्फी मतप्रवाह आहे असा अर्थ होत नाही, दिल्ली महापालिकेत भाजपने सत्ता गमावली, हिमाचलप्रदेशात देखील काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या आहेत, असे पवार म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मोदींना शुभेच्छा देतानाच गुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असे दिसते असा टोला लगावला आहे.

शरद पवार निवडणुकीवर बोलताना म्हणाले की, गुजरातची निवडणुक एकतर्फी होणार याबाबत कोणालाही शंका नव्हती. अनेक प्रकल्प गुजरातला कसे जातील याची काळजी घेण्यात आली. त्याचा परिणाम या निकालात पहायला मिळत आहे. पण गुजरातचा निकाल म्हणजे देशात एकतर्फी मतप्रवाह होत आहे असे नव्हे. हिमाचलमध्ये भाजपची सत्ता गेली आहे. दिल्ली, पंजाब नंतर आता हिमाचलमध्ये देखील भाजपची सत्ता गेली आहे. देशात अनेक ठिकाणी लोकांना बदल हवे आहेत. ही जी पोकळी आहे, ती भरुन काढण्यासाठी तयारीला लागले पाहिजे. आता किमान भाजपविरोधक एकत्र कसे येतील यासाठी तयारी कारायला हवी असे पवार म्हणाले.

तर गुजरात निवडणुकीवर प्रतिक्रीया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, मोदींच्या नेतृत्वात निवडणुक लढल्यामुळेच भाजपला भरघोस मतदान मिळाले. गुजरातच्या विजयामध्ये महाराष्ट्रातून पळवलेले उद्योग देखील फळले असल्याचा टोला यावेळी त्यांनी लगावला. पंतप्रधान 11 डिसेंबरला मुंबईत येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते येथे देखील ते भरघोस घोषणा करतील असे सांगतानाट आम आदमी पक्षाने मतांची विभागणी करुन भाजपला फायदा मिळवून दिल्याचे सांगत ठाकरे यांनी आम आदमी पक्षावर देखील निशाणा साधला.
हे सुद्धा वाचा
गुजरात : भाजप मोडणार सर्वाधिक जागांचा विक्रम, तर काँग्रेसचाही सर्वात कमी जागांचा विक्रम होणार!

सर्वात मोठी बातमी : संजय राऊत म्हणतात, भाजप आणि आपचे सेटिंग!

विधानसभा निवडणूक निकाल : गुजरातमध्ये भाजपची आघाडी; हिमाचलात काट्याची टक्कर

दरम्यान गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने जोरदार जल्लोष केला आहे. गुजरातमध्ये भाजपला मिळलालेले हे अभूतपुर्व यश मानले जात आहे. गुजरात मध्ये आपली सत्ता कायम राखण्यात भाजपला मोठे यश आले असून आम आदमी पक्षाची देखील गुजरातमध्ये एन्ट्री झाल्यामुळे आम आदमी पक्ष आता राष्ट्रीय पक्ष होण्याची वाटचाल दिसून येत आहे. काँग्रेसला मात्र निवडणुकीत पुन्हा मोठा फटका बसला आहे. काँग्रेसला आता विधानसभेतील विरोधीपक्ष नेता देखील निवडता येणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!