30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयगुजरात निवडणूक : भाजपाची 150 जागांवर आघाडी

गुजरात निवडणूक : भाजपाची 150 जागांवर आघाडी

गुजरात विधानसभा निवडणूक निकालाच्या प्राथमिक कलानुसार, बहुमताचा 92 आकडा पार करून भाजप आता 150 वर पोहोचला आहे. मोरबीमध्ये काँग्रेसच्या जयंती पटेल आघाडीवर आहेत. 140 हून अधिक लोकांचा बळी घेणाऱ्या मोरबी दुर्घटनेनंतर सत्ताधारी पक्षाने विद्यमान आमदार ब्रिजेश मेर्जा यांना डावलले.

गुजरात विधानसभा निवडणूक निकालाच्या प्राथमिक कलानुसार, बहुमताचा 92 आकडा पार करून भाजप आता 150 वर पोहोचला आहे. मोरबीमध्ये काँग्रेसच्या जयंती पटेल आघाडीवर आहेत. 140 हून अधिक लोकांचा बळी घेणाऱ्या मोरबी दुर्घटनेनंतर सत्ताधारी पक्षाने विद्यमान आमदार ब्रिजेश मेर्जा यांना डावलले. काँग्रेसने जयंती जेराजभाई पटेल यांना उमेदवारी दिली आणि पंकज रणसारिया हे आम आदमी पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

गुजरातेत भाजप सलग सातव्यांदा विजयी होईल, अशी चिन्हे आहेत. तसे झाल्यास पश्चिम बंगालमधील डाव्या आघाडीच्या पराक्रमाशी भाजप बरोबरी करेल. यामुळे मोदींचे नेतृत्व आणखी मजबूत होईल आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी कार्यकर्त्यात जबरदस्त आत्मविश्वास व उत्साह निर्माण होईल.

गुजरातमध्ये एकूण 70 राजकीय पक्ष आणि 624 अपक्ष रिंगणात आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवी, युवा नेते हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांच्यासह एकूण 1,621 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय आज होणार आहे. भाजप, काँग्रेस आणि आप यांच्यातील तिरंगी लढतीव्यतिरिक्त, बहुजन समाज पार्टीकडून 101 उमेदवार आणि भारतीय आदिवासी पक्षकडून 26 उमेदवार रिंगणात आहेत.

हे सुद्धा वाचा

विधानसभा निवडणूक निकाल : गुजरातमध्ये भाजपची आघाडी; हिमाचलात काट्याची टक्कर

भारतानं मालिका गमावली पण कर्णधार रोहितनं ‘दिल खुश कर दिया !’

कर्नाटक सीमाप्रश्नावर शरद पवारांनी दिलेला अल्टिमेटम संपला; आज पत्रकार परिषद घेत जाहीर करणार वाटचाल

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल अहमदाबादमधील घाटलोडिया येथून 13,500 मतांनी आघाडीवर आहेत.

आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री उमेदवार इसुदान गढवी खंभलियातून पिछाडीवर आहेत.

धरमपूरमधून भाजपचे अरविंद पटेल आघाडीवर आहेत.

सोमनाथमध्ये भाजपचे मानसिंग परमार आघाडीवर आहेत.

स्टार उमेदवार अल्पेश ठाकोर हे आघाडीवर असून हार्दिक पटेल पिछाडीवर आहेत.

सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये कतारगाम आणि वराछा रोडमध्ये आपचे उमेदवार भाजपच्या मागे आहेत. पाटीदार मतदार आणि आप फॅक्टरमुळे या जागा फोकसमध्ये आहेत. गोपाल इटालिया कटरगाममधून निवडणूक लढवत आहेत. वराछामधून अल्पेश कथिरिया हे भाजपचे कुमार कनानी यांच्याशी लढत आहेत.

जामनगर ग्रामीणमध्ये भाजपचे राघवजी पटेल आघाडीवर आहेत.

मांडवी (सुरत) येथून आम आदमी पक्षाच्या सायनाबेन गामित आघाडीवर आहेत.

एलिसब्रिजमध्ये भाजपचे अमित शहा आघाडीवर आहेत. हे केंद्रीय गृहमंत्री नसलेले नामसाधर्म्य उमेदवार आहेत.

काँग्रेस नेते लखाभाई भारवाड पिछाडीवर आहेत.

निवडणुकीतील दहा मुख्य उमेदवार :
घाटलोडियामधून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (भाजप).
विरमगाममधून हार्दिक पटेल (भाजप).
गांधीनगर दक्षिणमधून अल्पेश ठाकोर (भाजप).
वडगाममधून जिग्नेश मेवाणी (कॉंग्रेस).
अमरेली हून परेश धनानी (कॉंग्रेस).
खंबालिया हून इसुदान गढवी (आप).
गोपाल इटालिया (आप) कतरगाम.
रिवाबा जडेजा (भाजप) जामनगर उत्तर.
परशोत्तम सोळंकी (भाजप) भावनगर ग्रामीण.
भरत सोळंकी (काँग्रेस) गांधीधाम.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी