31 C
Mumbai
Thursday, November 16, 2023
घरराजकीयइस्रायल-पॅलेस्टिनींमध्ये युद्धचा भडका, हमासच्या हल्ल्याला इस्रायलकडून प्रत्युत्तर

इस्रायल-पॅलेस्टिनींमध्ये युद्धचा भडका, हमासच्या हल्ल्याला इस्रायलकडून प्रत्युत्तर

पॅलेस्टिनी अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर इस्रायलयने युद्धाची घोषणा केली आहे. आज (७ ऑक्टोबर) पहाटे
पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी गाझा पट्ट्यातून इस्रायलच्या दिशेने अवघ्या २० मिनिटांत पाच हजारांहून अधिक रॉकेट डागले. या हल्ल्यात 40 जण ठार झालेत तर शेकडो लोक जखमी झाल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे. तर गाझामध्ये १९८ लोक मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळत आहे. पॅलेस्टिनी अतिरेकी हमासच्या या घुसखोरीमुळे तसेच हल्ल्यामुळे पुन्हा युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर इस्रायलच्या सैन्यानेही हमासच्या हल्ल्याला उत्तर दिले आहे. यात अनेक लोकांचे बळी गेले असून शेकडो लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आतपर्यंत मृत आणि जखमींचा खरा आकडा इस्रायलाकडून जाहीर करण्यात आलेला नाही. पण पॅलेस्टिनींच्या हल्ल्यामुळे पुन्हा युद्धाला तोंड फुटले असून इस्रायल आता जास्त आक्रमक झाला आहे.

हमासच्या शेकडो अतिरेक्यांनी एसयूव्ही, मोटरसायकल आणि पॅराग्लायडरमधून इस्रायलमध्ये घुसखोरी करत नागरिकांवर बेधुंद गोळीबार केला. पहाटे सुरू झालेली ही झटापट अर्ध्यातासाहून जास्त चालली. हमासच्या ‘अल-अक्स स्टॉर्म ऑपरेशन’नंतर इस्रायलच्या सैन्यानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायल सैन्याने ‘आयर्न स्वोर्ड ऑपरेशन’ सुरू करत पॅलेस्टिनी अतिरेक्यांना तेवढेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या हल्ल्याचा भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. शिवाय इस्रायलच्या कठीण प्रसंगात भारत इस्रायलसोबत असल्याचाही ग्वाही दिली आहे. तर अमेरिकेनेही इस्रायलसोबत राहण्याची निर्धार केला आहे.

पॅलेस्टिनी अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यायाहू यांनी आमच्याच युद्ध सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. तर इस्रायली सैन्याने त्यांचे डझनभर लढाऊ विमाने गाझा पट्ट्यावर हल्ल्या करण्यात व्यग्र असल्याचे सांगितले आहे. हमासच्या अतिरेक्यांनी जमीन, समुद्र आणि पॅराग्लायडर्सच्या मदतीने हवाई पद्धतीने इस्रायलमध्ये प्रवेश केल्यामुळे खळबळ उडली आहे. दरम्यान, इस्रायलची गुप्तचर यंत्रणेचे हे अपयश आहे का, या प्रश्नाला इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे प्रवक्ते लेफ्ट. कर्नल रिचर्ड हेक्ट यांनी उत्तर देणे टाळले आहे. तर हमासने ही घोडचूक केल्याचा दावा, इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी केला आहे.

हा हल्ल्याबाबत एका गोष्टीकडे लक्ष वेधले जात आहे. इस्रायलच्या अरब शेजारी देशांनी बरोब्बर ५० वर्षांपूर्वी इस्रायलवर हल्ला केला होता. ६ ऑक्टोबर १९७३ रोजी हा हल्ला झाला होता. त्या घटनेला कालच ५० वर्षे पूर्ण झाली आणि लगेचच इस्रायलमध्ये घुसखोरी करून हल्ला करण्यात आला. याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गाझा पट्ट्यात हमासची सत्ता २००७ मध्ये आली. तेव्हापासून पॅलेस्टिनी आणि इस्रायल यांच्या अनेकदा संघर्ष झाला. यंदा २४७ पॅलेस्टिनी, ३२ इस्रायली आणि दोन परदेशी नागरिकांच्या या संघर्षात मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा

मुख्यमंत्र्यांचे आदेश येताच जिल्हा प्रशासन जागे झाले; जिल्हाधिकाऱ्यांची मध्यरात्री आरोग्य केंद्रांना अचानक भेट

गोरेगावमधील आगीला जबाबदार कोण? आमदार कपिल पाटील यांची सेफ्टी ऑडिटची मागणी

ऐतिहासिक कौपीनेश्वर मंदिर जीर्णोद्धाराच्या हालचाली वाढल्या

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी