29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयहसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्यांवर केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर चंद्रकांत पाटलांचा पलटवार

हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्यांवर केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर चंद्रकांत पाटलांचा पलटवार

प्रशांत चुयेकर : टीम लय भारी

कोल्हापुरात जोरात पाऊस सुरू असून बहुतांशी धरणे पूर्णपणे भरलेली आहेत. सर्वत्र थंडीचे वातावरण असले तरी राजकीय टोलेबाजीने मात्र वातावरण तापल्याचे सध्या चित्र आहे‌. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे पुन्हा आमने-सामने आले आहेत (Hasan Mushrif, Chandrakant Patil, Samarjit Ghatge came face to face again).

निमित्त आहे भाजपचे किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास हसन मुश्रीफ यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप. या आरोपाने कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. कोल्हापुरातील राष्ट्रवादी प्रेमींनी सोमय्या यांच्या विरोधात रस्त्यावर उतरत त्यांचा निषेध केला आहे.

Chandrakant patil : भाजपा नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्याचं स्वागत करतो, पण…; चंद्रकांत पाटलांनी सरकारला दिला सल्ला

Chandrakant Patil : शिवसेना एकाकी, भाजपची कॉंग्रेस,राष्ट्रवादीशी हातमिळवणी, अन् हे घडतंय कुठ तर चंद्रकांतदादांच्या गावात

मुश्रीफ यांनी सोमय्या यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा शंभर कोटींचा दावा ठोकणार असल्याचा इशारा दिला. सोमय्या यांच्या पाठीमागे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे हेच बोलवते धनी असावेत असा अंदाज मुश्रीफ यांनी व्यक्त केला. लवकरच पैरा फेडणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

Hasan Mushrif, Chandrakant Patil, came face to face
सोमय्या यांच्याविरोधात 100 शंभर कोटीचा दावा

Chandrakant Patil : शेतकरी आंदोलन पूर्वग्रहदूषित

Maharashtra govt failed to brief AG, cannot give excuses, says state BJP chief

चंद्रकांत पाटील यांनी अब्रूनुकसानीचे पैसे  व्हाईट असावे असा प्रतिटोला मुश्रीफ यांना मारला आहे तर मुश्रीफ यांनी पैसे उसने घेईन किंवा कर्ज काढेन किंवा गरज पडल्यास चंद्रकांत पाटील यांच्याकडून घेईन त्यांनी पैशाची चिंता करू नये असा पलटवार पाटील यांच्यावर केला आहे.

Hasan Mushrif, Chandrakant Patil, came face to face
कागलमध्ये माझीच हवा

समरजित घाडगे यांनी गल्लीतल्या धमक्यांना मी घाबरत नाही असा इशारा मुश्रीफ यांना दिला आहे. कुणीही नेता माझ्या सोबत नसताना  कागलमध्ये माझी हवा असल्याचा निर्देश त्यांनी दिला आहे. मुश्रीफ यांच्या समर्थनार्थ त्यांचे विरोधक संजय बाबा घाटगे सुद्धा उतरले आहेत.  आरोप म्हणजे लोक हिताला बाधा असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी