29.2 C
Mumbai
Friday, April 19, 2024
HomeराजकीयRahul Gandhi सत्तेत आल्यास देशातील संस्था आरएसएस मुक्त करू; राहूल गांधी यांचे...

Rahul Gandhi सत्तेत आल्यास देशातील संस्था आरएसएस मुक्त करू; राहूल गांधी यांचे आश्वासन

लोकशाहीप्रधान असणे आणि हुकूमशाही चालू न देणे हा काँग्रेसचा 'डीएनए' आहे. मात्र इतर पक्षांमध्ये निवडणूका कधी होणार असे का विचारले जात नाही, असा सवाल देखील यावेळी त्यांनी केला. ते तेलंगनामध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

जर २०२४ साली काँग्रेस सत्तेत आली तर देशातील संस्थांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ( RSS) मुक्त करून त्यांचे स्वातंत्र्य कायम ठेण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहूल गांधी यांनी दिले. यावेळी ते म्हणाले की, लोकशाहीप्रधान असणे आणि हुकूमशाही चालू न देणे हा काँग्रेसचा ‘डीएनए’ आहे. मात्र इतर पक्षांमध्ये निवडणूका कधी होणार असे का विचारले जात नाही, असा सवाल देखील यावेळी त्यांनी केला. ते तेलंगनामध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी राहूल गांधी म्हणाले ” देशातील संविधानिक ढाचा नष्ट झाला असून संस्थांवर पद्धतशीर हल्ले झाले आहेत… माध्यमांवर हल्ले झाले आहेत. माध्यमेच नाही तर न्यायव्यवस्था, नोकरशाहीवर देखील हल्ला होत आहे. “काँग्रेस सत्तेवर आल्यास, आम्ही हे सुनिश्चित करू की देशातील या संस्था आरएसएसपासून मुक्त करू आणि त्यांचे स्वातंत्र्य जपू. तसेच फक्त दोन-तीन लोकांच्या हातात पैसा राहणार नाही हे देखील सुनिश्चित करू असे राहूल गांधी यावेळी म्हणाले.
यावेळी राहूल गांधी यांनी आरोप केला की, देशात मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी सत्तेचे केंद्रीकरण झाले आहे. केंद्रात मोदी सरकार आणि तेलंगनामध्ये टीआरएस सरकार यांचे साठेलोटेवाले सरकार आहे. “भारत जोडो यात्रेची कल्पना “भाजप देशभरात पसरवत असलेल्या द्वेष आणि संतापाच्या विरोधात लढा देण्यासाठी आहे. यावेळी ओबीसी जनगणनेची आकडेवारी सार्वजनिक करण्याची मागणीही राहुल गांधींनी केली.

हे सुद्धा वाचा :

Indira Gandhi Death Anniversary : इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधींचे भावनिक ट्विट

BMC : मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत भाजप 25 वर्षे सत्तेत होता; मग चौकशीही 25 वर्षांची करा; काँग्रेस नेत्याचे आव्हान

Devendra Fadnavis : माझा एक फोन आणि बच्चु कडू गुवाहाटीत; फडणविसांनी सांगितली अंदरकी बात!

यावेळी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, आमचा पक्ष लोकशाहीवादी आहे. आमच्या इथे हुकूमशाही नाही. निवडणुका झाल्या आणि नवीन अध्यक्ष निवडला गेला. आम्ही हुकूमशाही चालवत नाही हा आमचा डीएनए आहे. आम्ही एकत्र लढू आणि जिंकू.” काँग्रेस अध्यक्षपदाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा संदर्भ देत ते म्हणाले, ही निवडणूक आम्ही पार पाडली. आरएसएस आणि भाजप आणि टीआरएस निवडणुका कधी घेणार? असा सवाल माध्यमे त्यांना का करत नाही, माध्यमे केवळ काँग्रेसलाच सवाल करतात असे देखील राहूल गांधी यावेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी