29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयमाझ्यावर काहीही आरोप कराल तर याद राखा, मानहानीचा दावा ठोकेन ! रामदास...

माझ्यावर काहीही आरोप कराल तर याद राखा, मानहानीचा दावा ठोकेन ! रामदास कदम यांचा ठाकरेंना इशारा

उद्धव ठाकरे यांची रविवारी संध्याकाळी रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेतून उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्याकडून सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर आक्रमक शैलीत टोलेबाजी करण्यात येत आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेते डिवचले गेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी ठाकरे यांच्या सभेआधीच सावध पवित्रा घेतला असून माझ्यावर काहीही आरोप कराल, तर मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेन, असा इशारा उद्धव ठाकरे यांना दिला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (if you accuse me of anything, I will sue for defamation!)

रामदास कदम हे बंगाली बाबा आहेत. पर्यावरण खात्याचे मंत्री असताना मिळालेल्या पैशांतून त्यांनी आपला मुलगा योगेश कदम यांना आमदार केल्याचा आरोप संजय कदम यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम हे आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर संजय कदम यांनी रविवारी सकाळी रामदास कदम व त्यांचे पुत्र योगेश कदम यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रामदास कदम हे बंगाली बाबा असल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे. रामदास कदम पर्यावरण खात्याचे मंत्री असताना मिळालेल्या पैशांतून त्यांनी आपला मुलगा योगेश कदम यांना आमदार केल्याचा आरोप संजय कदम यांनी केला. संजय कदम यांना रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, “वन आणि पर्यावरण विभाग असं हे खातं होतं. ते तोडून बाजुला केलं. मला काहीतरी द्यायला पाहिजे, म्हणून उद्धव ठाकरेंनी ते खातं मला दिलं. त्याला शून्य बजेट होतं. मुळात पर्यावरण खात्याला आर्थिक निधीची कोणतीही तरतूद नव्हती. तसेच हे खातंही अस्तित्वात नव्हतं. पर्यावरण खातं हे वेगळं कधीच नव्हतं.”

हे सुद्धा वाचा 

भविष्यात काँग्रेसला सोडचिट्ठी देणार का? रवींद्र धंगेकर म्हणाले…

शिंदेंना फक्त कागदावरच नाव आणि चिन्ह मिळालं; संजय राऊत यांचा टोला

मोदींच्या हुकूमशाहीचा देशातील नेत्यांकडून निषेध; सीबीआय, ईडीचा गैरवापर होत असल्याचा पत्राद्वारे आरोप

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी