30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयसीमा वादाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात नेत्यांमध्येच वाद पेटला

सीमा वादाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात नेत्यांमध्येच वाद पेटला

महाराष्ट्र सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी तोंड यावरून बोलावं, असेही ते म्हणाले. तीन महिन्यांपासून ते तुरुंगात आहेत. त्यामुळे बाहेरचे वातावरण त्यांना मानवत नाही. त्यांना पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये, असा टोला शंभूराज देसाई यांनी यावेळी संजय राऊत यांना लगावला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून संजय राऊत यांनी बुधवारी (ता. 7 डिसेंबर) सकाळी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यावर राज्य सरकारचे मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनाच बेळगाव न्यायालयातून समन्स आले होते, याबाबतची आठवण शंभूराज देसाई यांनी यावेळी करून दिली. मग कोर्टाची सुरक्षा असतानाही तो तिथे का गेले नाही ? संजय राऊत असे नाटक कसे करतात ? संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याला आमचा विरोध आहे. तसेच संजय राऊत यांना इशारा देताना शंभूराज देसाई म्हणाले की, तुम्ही साडेतीन महिने तुरुंगात विश्रांती घेऊन आला आहात. बाहेरील वातावरण तुम्हाला मानवत नाहीये. पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ देऊ नका, असेही ते म्हणाले. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात संजय राऊत तीन महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात होते. काही दिवसांपूर्वी त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. देसाई म्हणाले की, संजय राऊत यांची भाषा कोणीही खपवून घेणार नाही.

बेळगाव सीमा वाद प्रकरणी महाराष्ट्र सरकारने शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील या दोन मंत्र्यांना समन्वयाची जबाबदारी दिली आहे. मात्र, या दोन्ही मंत्र्यांनी दोनवेळा बेळगावचा दौरा रद्द केला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मंगळवारी राज्य सरकारवर निशाणा साधला. सरकारच्या मंत्र्याला तिथे जाणे सोयीचे वाटत नसेल आणि सीमेवर राहणाऱ्या मराठी भाषिकांवर अन्याय असाच वाढत राहिला तर आपण स्वतः बेळगावला जाऊ, असेही शरद पवार म्हणाले आहेत.

काय म्हणाले संजय राऊत?
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या जमिनीचं रक्षण करण्यात अपयशी ठरलेत. या सरकारला एक दिवसही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं सीमाभागांत सरकारी प्रेरणेनं जे काही सुरु आहे. कर्नाटकात भाजपचं सरकार आहे. केंद्रात भाजपचं सरकार आहे, हे लक्षात घ्या. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड होत आहे. हल्ले होत आहेत आणि प्रतिकार करणारे आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून अटक करुन तुरुंगात डांबलं जातंय. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही? आज मी आत्ताच वाचलंय, आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांना भेटायला दिल्लीत चाललेत. काय उपयोग आहे त्याचा ? त्यांना कळत नाही, काय चाललंय महाराष्ट्राच्यासंदर्भात ?’

‘महाराष्ट्राचे लचके सहजतेनं तोडता यावेत म्हणून शिवसेनेचं सरकार घालवलंय,’ असं म्हणत संजय राऊतांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार शाब्दिक हल्ला केला. अशाप्रकारची वेळ महाराष्ट्रावर कधीच आली नव्हती. इतके हतबल मुख्यमंत्री, इतके लाचार सरकार या महाराष्ट्रानं गेल्या 55 वर्षांत पाहिलेलं नाही. दोन मंत्र्यांनी काल शेपुट घातलं, जाणार होतो. हे म्हणे मर्द आणि स्वाभिमानी. काय चाललंय या राज्यात. डरपोक सरकार ! ज्यांना आपल्या महाराष्ट्रातील जनतेची काळजी नाही. महाराष्ट्राच्या सीमांची काळजी नाही, सीमा कुरतडल्या जातायत या राज्यांच्या. ज्या 105 हुतात्म्यांनी रक्ताचं पाणी करुन, बलिदान करुन हा महाराष्ट्र आणि मुंबई मिळवली आहे. कोणी याबाजुला कुरतडतंय, कुणी त्या बाजुनं कुरतडतंय. आणि हे सरकार षंडासारखं, नामर्दासारखं बसलेलं आहे. हो नामर्दच सरकार आहे.

हे सुद्धा वाचा

बदली प्रमाणपत्राशिवायही शाळांमध्ये मिळणार प्रवेश; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

आता एकनाथ शिंदे गटातूनही ‘राज्यपाल हटवा’चा सूर

कर्नाटक सीमा भागाचा दौरा करायचा की नाही हे मुख्यमंत्री ठरवतील, फडणवीसांचे वक्तव्य

दरम्यान, शंभूराज देसाई यांनी यानंतर संजय राऊत यांना प्रतिउत्तर देखील दिले आहे. शंभूराज देसाई म्हणाले की, ‘आताच तुम्ही साडेतीन महिन्यांचा आराम करुन तुरुगांबाहेर आला आहात. तुरुंगाबाहेरच वातावरण तुम्हाला मानवत नाही असं वाटतंय, म्हणून तुम्ही अशी वक्तव्य करताय. तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे तुम्ही अशी वक्तव्य करणं टाळावं.’

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वक्तव्य केल्यास आम्ही दोन हात करायला तयार आहोत, असेही देसाई यावेळी म्हणाले. महाराष्ट्र-कर्नाटक वादावर आम्ही चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. केंद्रानं या प्रकरणात लक्ष घालावं. संजय राऊत यांची बोलण्याची पद्धत महाराष्ट्र सहन करणार नाही. संजय राऊतांना षंड बोलण्याचा अधिकार नाही. संजय राऊतांनी आपलं तोंड आवरावं, असा इशारा देखील शंभूराज देसाई यांनी यावेळी राऊतांना दिला आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत जे वक्तव्य केले त्याचा मी धिक्कार करतो. केंद्राने या विषयात लक्ष द्यावं, समन्वय साधावा यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. असं असताना राऊतांनी ‘षंड’ शब्द वापरला. संजय राऊत यांनी स्वतः लढ्यात उतरा आणि मग मुख्यमंत्र्यांबाबत बोला, असं देसाई यावेळी म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी