30 C
Mumbai
Monday, November 13, 2023
घरराजकीयइस्रायलच्या हल्ल्यात बालकांचं काय होतंय?

इस्रायलच्या हल्ल्यात बालकांचं काय होतंय?

हमास आणि हस्रायल यांच्यातील युद्धाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. तरीही युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही, उलट दिवसेंदिवस युद्ध अधिक गडद होत आहे. त्यातच जोपर्यंत हमास इस्रायली ओलिसांची सुटका करत नाहीत तोपर्यंत गाझावरील हल्ले सुरूच ठेवणार, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंझामिन नेतान्याहू यांनी दिला आहे. त्यामुळे युद्धाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता एक महिन्यानंतरही शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्ट्यातील बालकांचे काय होत आहे, याचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याने या युद्धाला पूर्णविराम देण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.

या युद्धाच्या भीतीमुळे मुलांची अवस्था कशी झाली हे पाहिलं तर कुणाच्या काळजाला पाझर फुटेल. पण इस्रायल हल्ले थांबण्याचे नाव घेत नाही.

इस्रायली हल्ल्यात सर्वस्व गमावलेल्या लोकांचे, मुलांचे हाल होत आहेत. असे विदारक चित्र गाझा पट्ट्यात पाहायला मिळत आहे.

हमासने ७ ऑक्टोबर रोजी सकाळी इस्रायलवर रॉकेट डागले. एका तासात हमाने तब्बल पाच हजार रॉकेट इस्रायलवर डागले होते. यातील बरेच रॉकेट इस्रायलच्या युद्धविरोधी प्रणालीने उद्ध्वस्त केले. पण जे रॉकेट इस्रायलवर कोसळले त्यामुळे इस्रायलचे खूप नुकसान झाले. त्यानंतर इस्रायलने प्रतिकार केला. तेव्हापासून हमास बॅकफूटवर गेला आहे. त्यानंतर हमासने अनेक इस्रायली सैनिक आणि नागरिकांना ओलीस धरले आहे. आणि त्यांची सुटका हमास करत नाही तोपर्यंत गाझावरील हल्ले सुरूच राहणार, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी दिला आहे.

दरम्यान या एक महिन्याच्या युद्धात इस्रायल आणि हमास यांनी काय गमावले ते पाहुया

पॅलेस्टिनींचे नुकसान

मृत्यू – ९ हजार ५००

जखमी – २४ हजार १७५

विस्थापित – १० लाख ५२ हजार

उद्ध्वस्त घरे – ३३ हजार ९६०

वेस्ट बँकमधील मृत्यू – १४६

इस्रायलचे नुकसान

मृत्यू – १ हजार ४२८

जखमी – ५ हजार ४०३

विस्थापित – २ लाख ५० हजार

हमासने ओलीस ठेवलेले नागरिक – २४१

हे ही वाचा

इस्रायली सैन्याच्या गाझातील निर्वासित शिबिरावरील हल्ल्यात 33 ठार

मराठा आरक्षणावरून आत्महत्येचं सत्र सुरूच

रश्मिका मंदानाच्या नावावर काय खपवलं पाहा…

दरम्यान, गाझामधील जखमींवर उपचार करता यावेत यासाठी रोज सहा ते १२ तास युद्धबंदी करावी, इजिप्त आणि कतार या देशांनी केली आहे. पण ओलिसांच्या मुक्ततेवर इस्रायल अडून बसल्यामुळे इजिप्त-कतारच्या मागणीला इस्रायलने अजून प्रतिसाद दिलेला नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी