भाजपचे आमदार जयकुमार गोरे(jaykumar gore) यांची एकेक कहाणी ‘लय भारी’च्या हाती येत आहे. दहिवडी (ता. माण, जि. सातारा) येथे आज प्रकल्पग्रस्तांच्या सुनावणी झाल्या(Jayakumar Gore grabbed the lands of the farmers). केंद्र सरकारचा मुंबई – बंगळुरू औद्योगिक प्रकल्प’ हा भला मोठा प्रकल्प येऊ घातला आहे. हा प्रकल्प म्हसवड (ता. माण) येथील साधारण ८ हजार हेक्टर जागेवर होणार आहे. परंतु सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनी बळकावल्या आहेत. सातबाऱ्यांवर प्रकल्पांची नोंदणी करण्यात आली आहे. शेती, घरे सगळीच ठिकाणे सरकारने प्रकल्पासाठी अधिगृहीत केली आहेत.
मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या जयकुमार गोरेंसाठी तोंडाची वाफ घालवू नका
दुसऱ्या बाजूला अनेक दलाल व जमीन माफियांनी जमिनी विकत घेवून ठेवल्या आहेत. यातील मासाळवाडीच्या प्रकल्पग्रस्त नागरिकांना आज प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात बोलविण्यात आले होते. यावेळी ‘लय भारी’चे संपादक तुषार खरात हे सदर ठिकाणी पोचले. त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या भावना जाणून घेतल्या. साधारण १५०० प्रकल्पग्रस्त यावेळी उपस्थित होते. सरकारवर संतप्त झालेल्या लोकांनी ‘लय भारी’सोबत संवाद साधला. तरूण, मेंढपाळ व इतर शेतकरी होते. त्यात ९२ वर्षांच्या या आजोबांनी स्वतःची आपबिती कथन केली. या आजोबांच्या भावना हृदयाला पीळ पाडणाऱ्या होत्या. तुमची जमीन जाऊ देणार नाही, असा शब्द जयकुमार गोरे यांनी दिला होता. पण त्यांना ते भेटलेच नाहीत. आमची जमीन गेली तर मी पेटवून घेईन, असाही संताप या आजोबांनी व्यक्त केला आहे.