आमदार जयकुमार गोरे यांच्याविषयी माण – खटा व मतदारसंघातील जनतेमध्ये संतापाची भावना आहे. म्हसवड या परिसरात मुंबई – बंगळुरू औद्योगिक प्रकल्प येवू घातलेला आहे. धुळदेव, मासाळवाडी, मानेवाडी अशा पाच – सहा गावांतील शेतकऱ्यांच्या साडेपाच हजार हेक्टर, म्हणजेच 12 हजार एकर पेक्षा जास्त जमिनी सरकारने अधिगृहीत केल्या आहेत. बागायती जमिनीसह राहती घरेही अधिगृहीत करण्यात आली आहेत. (Jayakumar Gore supporter gets angry)
Devendra Fadanvis | महिलेला स्वत:चे नागडे फोटो पाठविणाऱ्याला फडणविसांनी बनविले कॅबिनेट मंत्री
यामुळे शेतकरी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर संतापले आहेत. आमदार जयकुमार गोरे यांनी आमच्यावर अन्याय केल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. काहीही करा, पण ही एमआयडीसी प्रकल्प परत पाठवा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. (Jayakumar Gore supporter gets angry)
आम्ही जयकुमार गोरे यांनाच आतापर्यंत मतदान केले. पण त्यांनी आमचेच नुकसान केले. पाणी येणार म्हणून आम्ही नटून बसलो. पण आमच्या जमिनीच घेतल्या. आणलेलं कॅनॉलचं पाणी आता आमच्या घरात सोडायचं का, असाही सवाल शेतकरी करीत आहेत. (Jayakumar Gore supporter gets angry)
24 वर्षाच्या तरूणाने आमदाराच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली
आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्हाला कुणाला मतदान करायचं याचा निर्णय घ्यावा लागेल, अशीही आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. (Jayakumar Gore supporter gets angry)