30 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरराजकीयJayant Patil : जयंत पाटील यांनी व‍िधानसभा अध्यक्षांवरच डागली तोफ !

Jayant Patil : जयंत पाटील यांनी व‍िधानसभा अध्यक्षांवरच डागली तोफ !

आज तर विधानसभा अध्यक्षांना घेरण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँगेसपक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केला. ते म्हणाले की, आपण सत्तारुढ पक्षाची बाजू घेऊन बोलत असल्याचा आम्हाला भास होतोय.

महाराष्ट्र विधापरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात अभूतपूर्व अशी खडाजंगी पहायला मिळाली. विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांनी जोरदार बँटींग करुन सत्ताधारी नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आघाडीवर होते. काल विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार तोफा डागल्या. मात्र एकनाथ शिंदेनी देखील ते वार आपल्या शब्द कौशल्याने परतवून लावले. आज तर विधानसभा अध्यक्षांना घेरण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँगेसपक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केला. ते म्हणाले की, आपण सत्तारुढ पक्षाची बाजू घेऊन बोलत असल्याचा आम्हाला भास होतोय.

त्या शिवाय आक्रमत होत सभागृहात मंत्र्यांच्या अनुपस्थिती बद्ल देखील त्यांनी विधानसभा अध्यक्षांना जाब विचारला. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर बोलतांना विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना थांबवले. यावर लागेचच हरकतीचा मुद्दा उपस्थ‍ित करत विधानसभा अध्यक्षांना जाब विचारला. विधानसभेत आज पुरवणी मागणीवर चर्चा होत असतांना सभागृहात अनेक मंत्री उपस्थ‍ित नव्हते. या विषयाकडे विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले. मंत्री नाहीत तर उत्तरे कोण देणार ? उत्तर द्यायची नसतील तर खातेवाटप कशासाठी केले ? चाळीस दिवस विस्तार थांबवला. आता उत्तर द्याला टाळाटाळ करत आहेत, असा थेट आरोप जयंत पाटील यांनी सत्ताधारी सरकारवर केला.

हे सुद्धा वाचा

Ashtavinayak Darshan: अष्टविनायक दर्शन – पहिला ‘गणपती’ कऱ्हेच्या तीरावरचा ‘मोरेश्वर’

Dhananjay Munde : MH-CET परीक्षेच्या गोंधळावरून धनंजय मुंडे भडकले

The path of fire :’अग्न‍िपथ’ योजनेबद्दल जनजागृती करणाऱ्या ‘भारत के अग्निवीर’ चित्रपटाचा मुहूर्त राज्यपालांच्या हस्ते

काल एक मंत्री आपल्याच भूमिकेच्या परस्परविरोधी भूमिका घेऊ शकतात का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उपस्थित केला. शिंदे आमच्या सोबत असतांना एक बोलले आणि आता तिकडे जाताच त्यांचा सूर बदलला आहे असे म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मिमिक्री केली. ते पाहून शिंदेही खळखळून हसले.

जयंत पाटील यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पॉईंट ऑफ ऑर्डरच्या अंतर्गत लक्ष केले होते. एकनाथ शिंदे महाविकास आघाडीमध्ये असतांना आमच्या शेजारी बसायचे. त्यावेळी त्यांच्यामध्ये उत्साह असायचा. हे बंद केले पाहिजे, ते चुकीचे आहे असे तो बोलायचे, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी या प्रस्तावाची इतकी भारी वक‍िली केली की, आम्ही सगळे प्रभावीत झालो होतो.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी