28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयदेवस्थानच्या जमिनी हडप करण्यात आल्याचा जयंत पाटील यांचा आरोप

देवस्थानच्या जमिनी हडप करण्यात आल्याचा जयंत पाटील यांचा आरोप

होळीच्या सुट्टीनंतर आज पुन्हा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विरोधकांनी पुन्हा सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारावीचा गणिताचा पेपर फुटल्यानंतर विरोधकांनी शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले आहे. शेतकऱ्यांच्या मुद्यावरही विरोधकांनी सरकारवर तोंडसुख घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत देवस्थानच्या जमिनी हडप करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पिंपळेश्वर महादेव देवस्थान, विठोबा देवस्थान, रामचंद्र देवस्थान अशा हिंदू देवांच्या मंदिराच्या ट्रस्टची जमीन हडप करण्याचा मोठा प्रकार झाला आहे. (Jayant Patil’s allegation that the land of the temple has been usurped)

हिंदू देवस्थानाच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार आपण सहन करणार नाही याची मला खात्री आहे. पिंपळेश्वर महादेव ट्रस्टमध्ये एका दुधसंघाच्या कर्मचाऱ्याच्या नावाने ५०-६० एकर जमीन आहे. विठोबा देवस्थानाची जमीन मनोज रत्नपारखे या व्यक्तीच्या नावावर आहे. रामचंद्र देवस्थानची जमीन रोहित जोशी यांच्या नावावर वर्ग झाल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

सरकार बदलल्यावर तक्रारदाराचं निशुल्क संरक्षण काढून टाकण्यात आलं. तसेच तक्रारदारावर अहमदनगरमध्ये पॉक्सोअंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणजेच तक्रारदाराला संरक्षण देण्याऐवजी त्याचं संरक्षण काढण्यात आलं. त्याच्यावर अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातून तक्रारदाराला नामोहरम करण्याचा प्रयत्न झाला असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

त्यात काय एवढे, सामान्यांच्या घरीही ४-५ कोटी सापडतात, भाजप आमदार विरुपक्षप्पांचे निर्लज्ज विधान

चाळीस डोके आणि पन्नास खोके ; सरकारचा संबंध डोक्याशी कमी खोक्याशी जास्त

१८० वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ इमारतीच्या म्युझिअमसाठी ५ कोटी रुपये ! ; जे. जे. चा इतिहास जनतेसमोर सादर करणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी