31 C
Mumbai
Saturday, December 14, 2024
Homeराजकीयलाडकी बहिण योजना निवडणुकीपुरती | ७० वर्षांच्या आजीबाईंनी सुनावले | Eknath Shinde...

लाडकी बहिण योजना निवडणुकीपुरती | ७० वर्षांच्या आजीबाईंनी सुनावले | Eknath Shinde | Ajit Pawar

जयकुमार गोरे यांनी माण व खटाव तालुक्यांत कशा पद्धतीने गुंडगिरी जोपासली आहे, याचे वारंवार तपशिल दिलेले आहेत(jaykumar gore is bad MLA). जयकुमार गोरे यांनी जोपासलेल्या गुंडगिरीचा शुक्रवारी ‘लय भारी’ला प्रत्यय आला.

जयकुमार गोरे यांनी माण व खटाव तालुक्यांत कशा पद्धतीने गुंडगिरी जोपासली आहे, याचे वारंवार तपशिल दिलेले आहेत(jaykumar gore is bad MLA). जयकुमार गोरे यांनी जोपासलेल्या गुंडगिरीचा शुक्रवारी ‘लय भारी’ला प्रत्यय आला.

तृतीय वर्ष विज्ञान शाखेत शिकणारी एक तरूणी भाजी विक्री करीत होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा यशस्वी करण्याचे तिचे स्वप्न आहे. वरकुटे – मलवडी येथील आठवडा बाजारात या तरूणीची योगायोगाने भेट झाली. त्यावर ‘लय भारी’चे संपादक तुषार खरात यांनी तिची मुलाखत घेतली. संशोधन, पीएचडी, स्पर्धा परीक्षा या मुद्द्यांवर वैचारिक पद्धतीची मुलाखत सुरू होती. त्याच वेळी जयकुमार गोरे यांनी पाळलेला वाळू माफिया किरण जाधव, या वाळू माफियाला मदत करणारा व वडापाव विक्रीचा व्यवसाय करणारा विजय उर्फ भावड्या चव्हाण, गुंड मल्हारी चव्हाण, या गुंडाचा विद्यार्थी असलेला मुलगा रोहित चव्हाण यांनी ही चालू मुलाखत बंद पाडली. त्यानंतरही जयकुमार गोरे यांचे आठ – दहा गुंड त्या ठिकाणी आले. त्यांनीही दांडगाई केली. विशेष म्हणजे, त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतरही जयकुमार गोरे यांच्या गुंडांना काहीही बोलता येत नव्हते. विचाराची लढाई विचाराने करण्याऐवजी अंगावर धावून जाण्याचा तालिबानी बाणा जयकुमार गोरे यांच्या गुंडांनी दाखवून दिला.एवढेच नव्हे तर दांडगाई, अरेरावी व धक्काबुकी करून तुषार खरात यांना तेथून निघून जाण्याची जबरदस्ती केली. पण तुषार खरात डगमगले नाहीत.

त्याच वेळी अभय जगताप, अनिल देसाई, प्रभाकर देशमुख व रणजीत देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संरक्षण दिल्यामुळे तुषार खरात यांनी बाजारात जावून महिला, शेतकरी यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. जयकुमार गोरे यांच्या विकासाचा बुरखा फाडणाऱ्या या प्रतिक्रिया ‘लय भारी’ लवकरच प्रसिद्ध करणार आहोत.
सर्वोच्च न्यायालयाने आमदार जयकुमार गोरे यांची संभावना ‘जनावरांवर भुंकणारा कुत्रा’ अशी केली आहे. ही उपाधी सार्थ ठरविण्याचा चंग जयकुमार गोरे बांधला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानुसार एखादं कुणी चांगलं काम करीत असेल तर त्याला ते काम करू द्यायचं नाही, त्या व्यक्तीवर कुत्र्यासारखं भुंकायचं, अशी कार्यपद्धतीत जयकुमार गोरे यांची आहे. हे भुंकण्याचं काम जयकुमार गोरे व त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत.
जयकुमार गोरे यांच्या या गुंडगिरीला भीक न घालता ‘लय भारी’ने बाजारात सामान्य लोकं व महिलांच्या प्रतिक्रीया घेतल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी