26 C
Mumbai
Saturday, December 14, 2024
Homeराजकीयमयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या जयकुमार गोरेंसाठी तोंडाची वाफ घालवू नका

मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या जयकुमार गोरेंसाठी तोंडाची वाफ घालवू नका

माण-खटावच्या हक्काचे साडेबारा टी.एम.सी. पाणी पुर्ण क्षमतेने आणता आले नाही(Jaykumar Gore’s corona scam fired by Shivaji Pol). ज्यांनी नुसत्या फुकाच्या बाता मारण्यात धन्यता मानली. आणि आता जे ठेकेदारांच्या कमिशनचे पैसे कमी पडले म्हणून माण-खटाव मधील भोळ्याभाबड्या मयत रुग्णांच्या टाळूवरील लोणी खात आहेत. त्या भस्म्या झालेल्या आमदार जयकुमार गोरे(Jaykumar Gore) यांच्यासाठी आपल्या तोंडाची वाफ घालवू नका. त्यांची लायकी माण-खटावच्या जनतेला चांगलीच समजलीय असा सणसणीत टोला मार्डी विकास सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी पोळ(Shivaji Pol) यांनी लगावला. तसेच राजू पोळ यांनी जिहे-कठापूर योजनेचा अभ्यास करून बोलावे अशी चपराक सुध्दा त्यांनी लगावली.

जयकुमार गोरे यांना वाळू चोरीचा कळवळा की, पायाखालची वाळू सरकली ?

शिवाजी पोळ म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभाकर देशमुख यांना नेहमीच सन्मानित केले आहे. तसेच प्रभाकर देशमुख यांनी जन्माला घातलेली साखळी सिमेंट बंधारे योजना असो वा जलयुक्त शिवार योजना, या योजनांना शासनाने उचलून धरले. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभाकर देशमुख यांना पंतप्रधान पुरस्कार देऊन गौरविले आहे. त्यामुळे कायम विविध गुन्ह्यांच्या चक्रात अडकणाऱ्या तसेच कमिशनचे लोणी खाणार्‍या नेत्याच्या चेल्यांनी भ्रष्टाचारावर बोलावं यासारखी हास्यास्पद गोष्ट दुसरी नाही.

आमदार जयकुमार गोरे म्हणजे अहंकार, प्रभाकर देशमुखांचे टीकास्त्र

शिवाजी पोळ पुढे म्हणाले, आमचे नेते शरद पवार, कै. अभयसिंह भोसले, कै. भाऊसाहेब गुदगे, कै. सदाशिवराव पोळ, कै. धोंडीराम वाघमारे, कै. वसंतराव कट्टे यांच्या दूरदृष्टीमुळे उरमोडी व जिहे-कठापूरचे पाणी माण-खटाव मध्ये आले. आमदारांनी फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम केले. उलटपक्षी प्रभाकर देशमुख यांनी शरद पवार यांना सांगून कालव्याचे रखडलेले काम मार्गी लावले म्हणूनच उरमोडीचे पाणी आज माण-खटावमध्ये खळाळत आहे. मात्र पंधरा वर्षांनंतर आजही तुम्हाला पाणी प्रश्न पुर्णपणे सोडविता आला नाही. प्रभाकर देशमुख यांच्या शेतीची तुम्ही काळजी करु नका. उरमोडीचे पाणी येण्यापूर्वी २०१२-१३ च्या दुष्काळात त्यांच्याच लोधवडे गावाने सोळा गावांना पाणी पुरवले होते.मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या जयकुमार गोरेंसाठी तोंडाची वाफ घालवू नका

शिवाजी पोळ पुढे म्हणाले, खोटं बोल पण रेटून बोल ही तुमची जुनीच सवय आहे. पाण्याचं राजकारण कोण करतंय हे जनता उघड्या डोळ्यांनी बघतीय. एवढीच जनतेची कणव असती तर ऐन दुष्काळात पाणी अडवून उभी पिकं जाळली नसती. मतांच्या राजकारणासाठी पाणी सोडताना दुजाभाव करण्याचं पाप आमदार गोरेंनी केलंय हे जनता कधी विसरणार नाही. वरकुटे मलवडी भागातील जनतेला ते कोणत्या भाषेत बोलले हे सगळ्यांना माहिती आहे. प्रभाकर देशमुख यांच्या हातून असलं पाप कधीच घडणार नाही याची आम्हाला खात्री आहे. उलट त्यांनीच पाठपुरावा करुन टेंभूचे अडीच टीएमसी पाणी नव्याने आरक्षित करुन घेतले. त्यांच्यामुळेच माण-खटाव मध्ये कोट्यावधी रुपयांचे साखळी सिमेंट बंधारे मंजूर होवून पुर्ण झाले. जलयुक्त शिवार योजनेत कोट्यावधींचा निधी मिळाला. नदी पुनर्रुजीवन अंतर्गत माण नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांचे पुनर्रुजीवन करण्यात आले. पाणी फाऊंडेशनच्या वाॅटर कपसाठी शरद पवारांनी सहा कोटी रुपये दिले.

शिवाजी पोळ पुढे म्हणाले, प्रभाकर देशमुख यांच्या पाठीशी प्रशासनातील तसेच समाजकारणातील मोठा अनुभव आहे. याच अनुभवाचा फायदा माण-खटावला होवून इथं औद्योगिक, शैक्षणिक क्रांती होणार आहे. ज्या शरद पवारांनी वयाच्या ८४ व्या वर्षी सगळे मातब्बर चितपट केले माढ्यामध्ये माती खायला लावली अशा वस्तादांचे प्रभाकर देशमुख हे शिष्य आहेत. या वयातही तुम्हाला ते चितपट करतील याचंच भय असल्यामुळे तुमच्याकडून अशी बेताल वक्तव्य केली जात आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.

Ramraje Naik Nimbalkar : जयकुमार गोरे यांच्यामुळे माणमधील औद्योगिक कॉरिडॉर कोरेगावला स्थलांतरीत झाला, रामराजे नाईक निंबाळकर यांचा गंभीर आरोप

आमची दिशा पक्की

माण-खटावच्या सर्वांगिण विकासाची आमची दिशा पक्की ठरली आहे. कोण कुठला आहे? अन कोण काय करतंय? हे सुज्ञ जनतेला चांगलं कळतं. विरोधकांच्या एकजुटीची काळजी तुम्ही करु नका. त्यासाठी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, राहुल गांधी, उध्दव ठाकरे खंबीर आहेत. तुम्ही फक्त मायणी प्रकरणात फाटलेले तुमचे कपडे सांभाळा. कोविडमधील मयतांची तसेच त्यांच्या नातेवाईकांची लागलेली हाय तुम्हाला सोसणार नाही. लवकरच तुमचे काळे धंदे जनतेसमोर येतील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी