25 C
Mumbai
Saturday, November 19, 2022
घरराजकीयJitendra Awhad : 'राजकारण आम्हीही केलं पण...' विनयभंगाचा आरोप जितेंद्र आव्हाडांच्या जिव्हारी

Jitendra Awhad : ‘राजकारण आम्हीही केलं पण…’ विनयभंगाचा आरोप जितेंद्र आव्हाडांच्या जिव्हारी

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. त्यांच्याविरुद्ध एका महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी गेल्या काही दिवसांपासून कमी होण्याऐवजी वाढत असल्याचेच दिसत आहे. चार दिवसांपूर्वी ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या शोदरम्यान मारहाण केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक केली होती. याप्रकरणी नुकतीच त्यांची सुटका झाली असताना आता त्यांच्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 354 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रविवारी (ता. 13 नोव्हेंबर) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा ठाण्यात बांधलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन करून परतत होते, तेव्हा हि घटना घडल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे जितेंद्र आव्हाड यांनी गर्दीत असलेल्या महिलेला खांद्याला दहरुन बाजूला केले आणि म्हंटले की, ‘धक्का बुक्कीत कशाला येता ? जरा साईडला व्हा ना..’ परंतु या घटनेमध्ये आव्हाड यांचा हेतू योग्य नसल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
जितेंद्र आव्हाड यांच्यावर दुसरी एफआयआर दाखल झाल्यानंतर ते म्हणाले की, हा आरोप पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे. माझी बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. तसेच पोलिसांनी माझ्यावर 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी एक विनयभंगाचा आहे. मी आमदार पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकशाहीचा खून मी उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही.

माझ्यावर जे कलम लावलेले आहेत त्याच्याबद्दल वाईट वाटलं. माझ्या खूनाचे षडयंत्र रचल्याचा आरोप लावला असता तरी मला चालले असते. मात्र, विनयभंगाचा आरोप मला मान्य नाही, असेही आव्हाड यांच्याकडून सांगण्यात आले. हे सर्व प्रसार माध्यमांशी बोलत असताना जितेंद्र आव्हाड भावुक झाले. भादंवि हे 354 कलम लावणे हे मनाला लागले असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. माझ्या मुलीला तिच्या मैत्रिणी विचारतात की, विनयभंगाची केस तुझ्या वडिलांवर ? त्यापेक्षा राजकारणात नकोच, असा निर्णय त्यांनी घेतला असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

समाजामध्ये मान खाली जाईल, असे आरोप माझ्यावर लावण्यात आले आहेत. राजकारण करावे पण इतक्या खालच्या पातळीवर करू नये. याआधीदेखील पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले आणि तिथे बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली, माझ्याविरोधात ओढूनताणून गुन्हा नोंदवला जात आहे. काहीही कारण नसताना आम्हाला कोठडीत ठेवले. त्यामुळे आम्ही माफी मागणार नाही असेही त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

मात्र, या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आव्हाड यांच्यावर केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचे सांगितले. मी त्यांना त्यांच्या आमदार पदाचा राजीनामा देऊ नये असे आवाहन करेन. जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा एफआयआर दाखल झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, व्हिडिओ पाहिल्यानंतर चुकीचे वाटते. कोणत्याही महिलेने अशा चुकीच्या पद्धतीने आणि शत्रुत्वासाठी एफआयआर दाखल करू नये.

हे सुद्धा वाचा

Jitendra Awhad : विनयभंग किती खरा किती खोटा, जितेंद्र आव्हाडांनी स्वत:हूनच केला व्हिडीओ जारी

Jitendra Awhad : कायदा हातात घेणं माझा जन्मसिद्ध हक्क : जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Bail : जितेंद्र आव्हाड तुरूंगाबाहेर, जामीन मंजूर; फडणवीस काय म्हणाले?

दरम्यान, या सर्व प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणेच महाविकास इतर पक्षाचे नेते देखील उभे राहिले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे. तुम्ही लढाऊ योद्धा आहात, आम्ही ही लढाई लढू आणि जिंकू.. काळजी करू नका, असेही दानवे म्हणाले.

गटार पातळीचे राजकारण
याबाबत समाजसेविका अंजली दमानिया म्हणाल्या की, महाराष्ट्रात आता गटारीचे राजकारण सुरू झाले आहे. जितेंद्र आव्हाड यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्याला एकदा नव्हे तर दहा वेळा पाहिल्यानंतरही विनयभंगासारखी घटना कुठेही दिसून येत नाही. ज्या महिलेने हा आरोप केला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. माझा राष्ट्रवादीशी किंवा जितेंद्र आव्हाडांशी काहीही संबंध नाही. मात्र, प्रथमदर्शनी हे आरोप निराधार असल्याचे दिसून येत आहे, असेही अंजली दमानिया यांच्याकडून स्पष्ट सांगण्यात आले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!