31 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरराजकीयडॉ. जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना केला सॅल्यूट !

डॉ. जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना केला सॅल्यूट !

विकास आघाडीचे सरकार असताना मविआ सरकार आणि राज्यपाल यांच्यात वारंवार तंटे उडत होते. मविआ सरकार कोसळल्यानंतर राज्यपालांविरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी राज्पलांनी महापुरूषांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी त्यांना राज्यपाल पदावरुन हटविण्याची मागणी देखील केली होती. अशातच आता तामिळनाडूमध्ये देखील राज्यपाल विरोधात राज्य सरकार असा सामना रंगला आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणाच्या मुद्द्यावरुन तामिळनाडूत आता राजकारण तापले आहे. राज्यपाल आर.एन रवि यांनी सभागृहात केलेले अभिभाषण रेकॉर्डवरुन हटविण्याचा ठराव तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांनी  विधानसभा अध्यक्षासमोर मांडला होता. त्यामुळे राज्यपाल सभागृहातून बाहेर पडले. सरकारने मंजूर केलेल्या अभिभाषणात पेरियार, डॉ. आबेडकर तसेच इतर महापूरुषांबद्दलचे जे उल्लेख होते. ते राज्यपालांनी वगळले त्यामुळे तामिळनाडूत राज्यपाल विरुद्ध सत्ताधारी वातावरण निर्मान झाले आहे.

दरम्यान सा सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत त्यांना सलाम केला आहे. राज्यपालांनी सरकारने मंजूर केलेल्या अभिभाषणात बदल करत पेरियार, डॉ. आंबेडकर यांचे भाषणातील मुद्दे वगळले. त्यावर मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (Chief Minister MK Stalin) यांनी आक्षेप घेतला. जय भीम असे म्हणत डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एम.के. स्टॅलिन यांना सलाम केला आहे. (Jitendra Awad saluted Chief Minister MK Stalin)


हे सुद्धा वाचा

Good News : नवी मुंबई मेट्रोचे 19 जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन !

महापालिकांमध्ये स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढणार

सरकारी कर्मचाऱ्यांना धनलाभ; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि राज्यपाल आरएन रवि यांच्यात अभिभाषणाच्या मुद्द्यावरुन सोमवारी (दि.९) रोजी आक्षेप घेतला. राज्य सरकारने मंजूर करुन दिलेल्या अभिभाषणातील धर्मनिरपेक्षता, पेरियार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. कामराज, सीएन अन्नादुरई, करुणानिधी अशा अनेक नेत्यांबद्दलचा उल्लेख राज्यपालांनी टाळले. त्यामुळे राज्यपालांनी बदल केलेले अभिभाषण रेकॉर्डवर न घेता राज्य सरकारने मंजूर केलेले अभिभाषण रेकॉर्डवर घ्यावे असा ठराव मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी विधानसभा अध्यक्षांकडे मांडला. यावेळी राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील झाली. त्यामुळे राज्यपाल सभागृहातून बाहेर पडले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी