30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयजितेंद्र आव्हाडांचा 'तो' व्हिडीओ मॉर्फ करुन व्हायरल केला; राष्ट्रवादीची कारवाईची मागणी

जितेंद्र आव्हाडांचा ‘तो’ व्हिडीओ मॉर्फ करुन व्हायरल केला; राष्ट्रवादीची कारवाईची मागणी

जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या कथित व्हिडीओमुळे सिंधी समाज आक्रमक झाला होता. जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र संबंधीत व्हिडीओ मॉर्फ केलेला असून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात चिथावणी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी कोपरी पोलिसांना निवेदन दिले आहे. या निवेदनानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये शनिवार (दि 27 मे) रोजी नेताजी चौक, उल्हासनगर येथे पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये आमदार आव्हाड यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ मॉर्फ करुन तो सोशल मिडीयावर पसरवून त्यांची नाहक बदनामी करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी शंकर मंदिर हॉल, कोपरी, ठाणे (पूर्व) येथे शिवसेना शिंदे गटाचे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीत डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचा व्हिडिओ माॅर्फ करून सिंधी समाजाला दाखवून चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. तसेच आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या घरावर हल्लाबोल मोर्चा काढण्याचा कट रचून आव्हाड यांना जीवे ठार मारण्याचे षडयंत्र रचले आहे.

त्यामुळे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणाच्या मूळ व्हि़डीओमध्ये छेडछाड करुन मॉर्फ करुन तसेच सिंधी समाजाची दिशाभूल करुन त्यांची बदनामी करण्या-यांविरोधात तसेच कोपरी, ठाणे येथे बैठकीमध्ये चिथावणीखोर भाषण करणा-यांच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

प्रतीक्षा संपली; उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार

वन विभागाने २० वर्ष अडवली वाडा-मनोर महामार्गाची वाट!

राज्यातील ‘या’ भागात भीषण जलसंकट, दुषित पाणी देतयं आजारांना आमंत्रण

यासंदर्भात कोपरी पोलीस ठाण्यात जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या सहीचे निवेदन दिले. दरम्यान, यावेळी प्रदेश चिटणीस मा. नगरसेवक सुहास देसाई यांनी,” डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणाला माॅर्फ करून चिथावणी दिली जात आहे. हे असह्य आहे. म्हणून आता आम्ही न्याय मागण्यासाठी येथे आलो आहोत. असे कृत्य करणाऱ्या समाजकंटकावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी