25 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराजकीय'गौतमी पाटीलच्या डान्सने ठाणे झाले ओव्हरस्मार्ट'

‘गौतमी पाटीलच्या डान्सने ठाणे झाले ओव्हरस्मार्ट’

राज्यात अनेक दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून राजकारण सुरू आहे. काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून राजकीय संबंध असल्याचे वक्तव्य काही नेतेमंडळी करत आहेत. तर कोणी सुरू असलेल्या संवेदनशील काळात आणखी वादाची ठिणगी पेटवत आहेत. दिवाळी सणात आनंदाच्या वातावरणात विष कालवण्याचे काम सत्ताधारी करत असल्याचा आरोप विरोधी नेते करतात. याच दिवाळीत आनंदी वातावरणात ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमात ठाणेकरांनी चक्क गौतमी पाटीलसह (Gautami Patil) ताल धरला आहे. यावर आता राष्ट्रवादी नेते आमदार जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) ठाण्यातील दिवाळी पहाटेवरून सरकारला धारेवर धरले असून ठाणे शहराच्या (Thane City) संस्कृतीवर देखील प्रश्न उपस्थित केला आहे.

(१२ नोव्हेंबर) दिवशी दिवाळी पहाट देशात अनेक ठिकाणी साजरी केली जाते. काही ठिकाणी काव्यसंमेलन असते. तर काही ठिकाणी साहित्यसंमेलन असते. तर काही विभागात तरूणांना विरंगुळा म्हणून नाचगाण्याचा कार्यक्रम असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम आयोजित केला. मात्र यंदाचा दिवाळी पहाट कार्यक्रम ठाण्यातील चिंतामणी चौकात शिंदे गटाच्या माध्यमातून आणि महिला जिल्हा संघटक यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात गौतमी पाटीलच्या नाचगाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हे आतापर्यंत कधीच घडले नव्हते मात्र यंदा शिंदे गटाच्या वतीने दिवाळी पहाट या कार्यक्रमाचा चेहरा बदलला असून जितेंद्र आव्हाडांनी शिंदे गटाचे चांगलेच कान टोचले आहेत.

हेही वाचा

विराटच्या गोलंदाजीवर अनुष्काला हसू आवरेना

विराटची स्वाक्षरी पाहून ऋषी सूनक काय म्हणाले?

500 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ‘हे’ भारतीय फलंदाज टॉप फाईव्ह

काय म्हणाले आव्हाड?

दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी गौतमी पाटीलला बोलावण्यात आले आहे. यावर जितेंद्र आव्हाडांनी ठाणे शहराच्या संस्कृतीबाबत भाष्य केले आहे. स्मार्ट शहरांच्या यादीत ठाणे शहराचा समावेश होतो. मात्र यावर आव्हाडांनी वक्तव्य करत शिंदे गटाला ठाणे शहराची ओळख सांगितली, ते म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा दिवाळी पहाट लावणीने साजरी केली गेली. संस्कृती बद्दलली ठाणे स्मार्ट नाही ओवर स्मार्ट झाले’, असे ट्वीट करत आव्हाडांनी ठाणे संस्कृतीवर भाष्य करत शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी