29 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराजकीयखळबळजनक : जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणखी एक विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मनसेच्या...

खळबळजनक : जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणखी एक विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मनसेच्या नेत्याने रचले होते कारस्थान !

हर हर महादेव चित्रपटादरम्यान विवियाना मॉल येथे झालेल्या गदारोळ प्रकरणातील तक्रारदार परिक्षित धुर्वे ह्याला मनसेच्या ठाण्यातील एका वरिष्ठ नेत्याने महाराष्ट्रातील एका वरिष्ठ नेत्याशी बोलणं करुन दिलं आणि त्या दोघांनी मिळून तक्रारदाराच्या पत्नीला माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल करण्यास सांगितले. मी त्या ताईचा आभारी आहे, कि त्या ताईने स्वत:हून सांगितले, कि मी असला घाणेरडा गुन्हा दाखल करु शकत नाही. आणि आपल्या मतावर ती ठाम राहिली. घोडबंदरचा एक नगरसेवक ह्या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी होता. म्हणजे माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल करायचा हे कधीपासून ठरलं होतं ते बघा, असं म्हणत जितेद्र आव्हाड यांनी स्वतः याप्रकरणातील खुलासा केला आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात हर हर महादेव चित्रपटावरून राजकारण पेटल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराडे छत्रपती यांनी महाराष्ट्रात तयार होत असलेल्या चित्रपटांमधून छत्रपतींचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला जात असल्याचा आरोप केला. त्यानंतर या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या निवासस्थानाजवळ असणाऱ्या ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये रात्री सुरू असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला. त्यानंतर काही दिवसांतच जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणात जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

हर हर महादेव चित्रपटादरम्यान विवियाना मॉल येथे झालेल्या गदारोळ प्रकरणातील तक्रारदार परिक्षित धुर्वे ह्याला मनसेच्या ठाण्यातील एका वरिष्ठ नेत्याने महाराष्ट्रातील एका वरिष्ठ नेत्याशी बोलणं करुन दिलं आणि त्या दोघांनी मिळून तक्रारदाराच्या पत्नीला माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल करण्यास सांगितले. मी त्या ताईचा आभारी आहे, कि त्या ताईने स्वत:हून सांगितले, कि मी असला घाणेरडा गुन्हा दाखल करु शकत नाही. आणि आपल्या मतावर ती ठाम राहिली. घोडबंदरचा एक नगरसेवक ह्या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी होता. म्हणजे माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल करायचा हे कधीपासून ठरलं होतं ते बघा, असं म्हणत जितेद्र आव्हाड यांनी स्वतः याप्रकरणातील खुलासा केला आहे.

हे सुद्धा वाचा

मोठी बातमी :शिवसेनेसोबत युती करण्यास प्रकाश आंबेडकरांची तयारी, पण ‘महाविकास आघाडी’मुळे खोळंबा !

IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा उचलबांगडी

धारावीचं घबाड अदानीच्या घशात!

विशेष म्हणजे या प्रकरणानंतर आपल्याला आणखी एका विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सगळा सापळा रचला असल्याचा थेट आरोप आता जितेंद्र आव्हाड यांनी केल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकारण पेटण्याची चिन्हे दिसत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी बंद पाडलेला हर हर महादेव हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अजरामर पावनखिंडीच्या लढाईवर आधारित आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यात दाखवलेल्या लढाईच्या प्रसंगावर आव्हाडांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर या चित्रपटाचे शो पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आग्रह धरला होता.

दरम्यान, हर हर महादेव हा चित्रपट मराठीसह एकुण 5 भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आलेला आहे. या सिनेमाचे विशेष आकर्षण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सिनेमाला व्हॉईस ओव्हर देण्याचे काम केले आहे. त्यामुळे आव्हाडांनी शो बंद पाडल्यानंतर राज्यभरातील मनसेसैनिक आक्रमक झाले होते. आता आव्हाडांनी पुन्हा एकदा मनसेवर थेट आरोप केल्याने राजकारण पुन्हा एकदा तापण्याचे संकेत मिळत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी