26 C
Mumbai
Friday, December 8, 2023
घरराजकीयमोदींवरील भाजपच्याच ट्विटचा दाखला देत आव्हाडांनी केली पंचाईत

मोदींवरील भाजपच्याच ट्विटचा दाखला देत आव्हाडांनी केली पंचाईत

‘पंतप्रधान मोदींचा पराभव होऊ शकतो, असे विरोधकांना वाटते. स्वप्न पाहत राहा! टर्मिनेटर नेहमी जिंकतो.’ अशा आशयाचे ट्विट भाजपाने फोटोसह अपलोड केले. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, ‘The Terminator याचा मराठीतील अर्थ विध्वंस करणारा असा होतो. बीजेपीला खरच आपल्या नेत्याला #TheTerminator म्हणायचं आहे का ? याचा एकदा विचार करावा,’ असा सवाल केला आहे. त्याला भाजपा काय उत्तर देते हे पहावे लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या दृष्टीने ‘विश्वगुरु’ आहेत. तशी प्रसिद्धी भाजपा करतेही. हेच मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २७ फेब्रुवारी २००२ मध्ये गोध्रा हत्याकांड घडले होते. त्यानंतर गुजरात राज्य अनेक महीने धुमसत होते. यात १२०० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला होता. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना घडलेल्या हत्याकांडाने ते अस्वस्थ झाले. त्यांनी गुजरात दौरा केल्यावर मोदी यांना ‘राजधर्म’ शिकण्याचा सल्ला दिला. सोनिया गांधी यांनी तर मोदींची संभावना ‘मौत का सौदागर’ अशी केली. हळूहळू मोदी यांचे प्रतिमासंवर्धन संघाने करत त्यांची ‘विकासपुरुष’ अशी प्रतिमा तयार केली. आणि नंतर मोदी यांनी मागे वळून पहिलेच नाही. त्यांनी गुजरातचे नाव जाहिरातींच्या माध्यमातून भारतात पोहचवण्याचा प्रयत्न केला.

vibrant Gujaratच्या माध्यमातून आपोआप मोदी हे निर्माणकर्ते झाले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कानावर गुजरातच्या विकासाबाबतची माहिती येताच ते गुजरातला गेले. आणि तिथला पाहुणचार घेतल्यानंतर मोदी यांचे गोडवे गाऊ लागले. पण काही वर्षांनी त्यांना त्यांची चूक निदर्शनास आली आणि त्यांनी अनेक सभामध्ये मोदींवर टीकाही केली. मोदी २०१४ पासून दोनदा पंतप्रधान झाले आहेत.

या नऊ वर्षात त्यांनी काश्मीरचे ३७० कलम हटवले. तिहेरी तलाकबाबत खमकी भूमिका घेतल्याने ते देशातील हिंदूंचे तारणहार आहेत. असे भाजपच्या समर्थकांना वाटते. असे असताना मोदी ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ चे स्वप्न पाहून भारतातून कॉँग्रेसला मुळापासून उखडून टाकण्याची भाषा करत आहेत. नेहरू आणि कॉँग्रेसने देशात घराणेशाही पोसली असाही आरोप करतात. त्यावर त्यांचे विरोधक नाराज आहेत. कॉँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे मोदी आणि गौतम अदानी यांची मैत्री, अदानीसाठी मोदी यांनी देशातील सार्वजनिक कंपन्या कशा विकायला काढल्या आहेत, याचा पाढा कायम वाचत आहेत.

काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली. लोकसभा निवडणुका केवळ मोदींच्या जीवावर जिंकणे कठीण आहे, असे इनपुट भाजपला मिळायला लागले आहेत. त्यामुळेच आता तर ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ म्हणून ते लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुका घेण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवत आहेत. असा आरोप विरोधक करत आहेत. साम्यवादी विचारसरणीचे नेते सीताराम येचुरी यांनी दोन निवडणुका घेणे धोकादायक असल्याचे एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात सांगितले आहे. असे असताना भाजपा मात्र खुशीत गाजरे खात आहे.

हे सुद्धा वाचा 
जालना लाठीचार्ज प्रकरणी फडणवीसांनी मागितली मराठ्यांची माफी!
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा शिरच्छेद करणारास 10 कोटींचे बक्षिस; संत परमहंस आचार्यांची घोषणा
ट्रेनी एअर होस्टेसची गळा चिरून हत्या; आरोपीने सफाईच्या बहाण्याने केला फ्लॅटमध्ये प्रवेश

भारताची चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्यापासून भाजपला आकाश ठेंगणे झाले आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य हे यान सोडल्यानंतर भाजपाकडून आपल्या नेत्याच्या प्रतिमा संवर्धनाची जोरदार मोहिमच सुरू झाली असून त्यातून, ‘पंतप्रधान मोदींचा पराभव होऊ शकतो, असे विरोधकांना वाटते. स्वप्न पाहत राहा! टर्मिनेटर नेहमी जिंकतो.’ असे ट्विट भाजपाने मोदींच्या फोटोसह केले आहे. The Terminator या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ “एखादी व्यक्ती किंवा गोष्ट जी काहीतरी संपवते. अर्थात विध्वंस करते त्याला ‘टर्मिनेटर’ म्हणतात ” तसेच टर्मिनेटर या शब्दाचा दुसरा अर्थ, ‘ग्रहांच्या शरीराचा प्रकाश भाग आणि गडद भाग यांच्यातील विभाजन रेखा’ असाही आहे. यातील पहिला मराठीचा अर्थ घेऊन आव्हाड यांनी घेऊन भाजपवर टीका केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी