33 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
HomeराजकीयJitendra Awhad : मोदी सरकारने गरीबांचे कंबरडे मोडले, डॉ. जितेंद्र आव्हाडांनी सोप्या...

Jitendra Awhad : मोदी सरकारने गरीबांचे कंबरडे मोडले, डॉ. जितेंद्र आव्हाडांनी सोप्या शब्दांत सांगितले समजावून!

महागाईमुळे अनेकांना संसार चालवणे कठीण झाले आहे अशा वेळी त्यांचा विचार कोण करणार असे म्हणून टॅक्सीड्रायव्हर आणि रिक्षाचालक असे दोन्हींच्या अडचणींकडे जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष वेधले आहे.

महागाईचा चटका दिवसेंदिवस वाढू लागला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून या चटक्याची झळ सर्वसामान्यांना पोळून काढत आहे, सरकार मात्र आपल्याच भूमिकेवर ठाम असून दरवाढीचा आलेख कायम चढताच ठेवत आहे. त्यावर राष्ट्रवादी नेते डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी टीका करत सरकारला सद्यस्थितीची जाणीव करून देत सरकारच्या आढमुठेपणाच्या भूमिकेवर टीका केली आहे. दरवाढीमुळे रिक्षा चालक आणि शेतकरी यांचे संसार कसे चालणार असा उद्वीगतेने प्रश्न करीत या घटकांचा सर्वांनीच विचार करायला हवा असे त्यांनी म्हटले आहे. महागाईमुळे अनेकांना संसार चालवणे कठीण झाले आहे अशा वेळी त्यांचा विचार कोण करणार असे म्हणून टॅक्सीड्रायव्हर आणि रिक्षाचालक असे दोन्हींच्या अडचणींकडे लक्ष वेधले आहे.

महागाईच्या प्रश्नावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, वर्षभरामध्ये CNG चा दर 36 रुपयांनी वाढला आहे. कालच रात्री CNG च्या दरामध्ये 6 रुपयांनी वाढ झाली असल्याची बातमी आली. प्राप्त परिस्थितीमध्ये मी हे लिहीत असताना कदाचित रिक्षामध्ये बसणारे थोडेसे अस्वस्थ होतील. पण, संसार तर सगळ्यांनाच चालवायचा असतो. रिक्षामध्ये होणारा CNG चा वापर आणि रिक्षाला प्रति किलोमीटर किती CNG लागतो. ह्याचे गणित मांडले तर कमाईतील 50 टक्के हे CNG रिक्षामध्ये टाकण्यात येते. साधारण 12 तासामध्ये एखाद्या रिक्षावाल्याने 1000 रुपये कमावले, तरीही त्यामधील कमीत-कमी 400 रुपये हे त्याला CNG पोटी खर्च करावे लागतात. जेव्हा CNG चे दर कमी होते तेव्हा CNG वरची रिक्षा परवडत होती आणि त्याचा फायदा देखील होता.

हे सुद्धा वाचा

Congress agitation : एकनाथ शिंदे सरकारची हुकुमशाही, काँग्रसचे आंदोलन दाबण्यासाठी पोलिसांकडून आटोकाट प्रयत्न

Eknath Shinde cabinet : मंत्रीपदासाठी धनगर समाजाकडून दोघे शर्यतीत, पण तूर्त दोघांनाही थांबावे लागणार !

Aaditya Thackeray : यशवंत जाधवांच्या मतदार संघातही आदित्य ठाकरेंना दणक्यात प्रतिसाद !

त्यामधील एक मुख्य मुद्दा असा आहे कि, रिक्षा चालवणारे अर्धे अधिक चालक हे रिक्षाचे मालक नसतात तर त्यांनी दिवसभर केलेल्या धंद्याचे काही टक्के हे मालकाला द्यावे लागतात. अशा आर्थिक करारावरती रिक्षा चालवली जाते. कुठल्याही झोपडपट्टीमध्ये भाडेतत्वावर घर घेण्याचे ठरवले तर कमीत-कमी 4 ते 5 हजार रुपये इतके भाडे भरावे लागते. संपूर्ण संसाराचा खर्च विचारात घेतला तर ते अधिक 5000 रुपये होतात. म्हणजे रिक्षावाला कमावणार काय? खाणार काय? आणि मेहनत करणार काय? असे म्हणून त्यांनी रिक्षा चालक कशा परिस्थित गुजराण करतात याचे वर्णन आव्हाड यांनी केले आहे. दरम्यान यामध्ये त्यांनी विशेषतः शहरातील रिक्षा-चालक मालकांचा आढावा घेतला आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणतात, आज ठाणे तसेच मुंबईमध्ये जवळ-जवळ लाखोने रिक्षा चालक-मालक आहेत. सध्याच्या महागाईचा विचार करता रिक्षा चालक आपला संसार कसा चालवत असतील याचा आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. कारण, रिक्षा ही आता वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. एकेकाळी राज्य किंवा महापालिका यांची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोसळलेली असतांना सामान्य माणसाला रिक्षाशिवाय पर्याय राहिलेला नाही. अशा अवस्थेमध्ये रिक्षा चालक- मालकांसमोर आलेली अडचण याबाबत समाजाने जरुर विचार करावा.

हे सरकार शेती मालामध्ये देखील भाव वाढवायला तयार नाही. पण, त्याच्यावरती GST लावायला तयार झाली आहे. फिक्स प्राईस वरती त्यांचा विश्वास नाही म्हणजे विकत घेणा-याला सर्वच फायदे मिळाले पाहीजेत हा केंद्र सरकारचा विचार आहे. शेतकरी असो… नाहीतर रिक्षाचालक… यांचे संसार कसे चालतील याचा कुठलाही विचार समाजातील एकही घटक करताना दिसत नाही. आपण एवढे आत्मकेंद्रीत झालो तर पुढे कसे होईल. याचा आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा असे म्हणून त्यांनी जितेंद्र आव्हाड यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी