28 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमहाराष्ट्र'मध्य प्रदेशात भाजप सरकार आणा आणि रामाचे दर्शन घ्या'; भाजपकडून ऑफर?

‘मध्य प्रदेशात भाजप सरकार आणा आणि रामाचे दर्शन घ्या’; भाजपकडून ऑफर?

मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुक (Madhya Pradesh Legislative assembly Election) येत्या (१७ नोव्हेंबर) दिवशी होणार आहेत. या निवडणुकांमध्ये काही दिवसांपासून केवळ मध्य प्रदेशच नाही तर भारतातील अनेक राज्यांचे लक्ष लागले आहे. भाजप निवडणुकांमध्ये विजयी होण्यासाठी कधी काय करेल हे सांगता येत नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने जाहिरातींवर अमाप पैसा खर्च केला. त्यानंतर त्यांनी राज्यात मराठा आरक्षण देणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही तसे काही झाले नाही. हिंदूत्ववादी विचारसरणी म्हणून अनेकदा भाजपची (BJP) ओळख आहे. भाजप श्रीरामाचा वापर करत राजकारण करत असल्याचा दावा आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) केला आहे.

काही दिवसांवर मध्य प्रदेशच्या निवडणुका सुरू होणार आहेत. या दिवशी मतदार कोणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजप प्रचार करत असताना आश्वासन देते. लोकसभा निवडणुकांच्या काळात भाजपने देश भ्रष्टमुक्त होईल, महागाई कमी होईल, हिंदूराष्ट्र होईल असे अनेक आश्वासन भाजपाने दिले होते. मात्र आता भाजपाने आश्वासन न देता लालच दाखवत मत मागण्याचे काम करत असल्याची माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा

सुप्रिया सुळेंचे आरक्षणासाठी सरकरला गाऱ्हाणे

नवरा-बायकोच्या अतुट नात्याचा सण दिवाळी पाडवा

‘वकील शरद पवारांना म्हणतात सॉरी’

भाजपचे नेते अमित शहा यांनीच हे लालच दाखवले आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. त्यांनी मध्य प्रदेशातील मतदारांना एका मोबदल्यात मागणी केली आहे. ते म्हणाले की, ‘३ नोव्हेंबरपर्यंत रामलल्लाचे दर्शन घ्या आणि भाजपाचे सरकार आणा त्याचा सर्व खर्च भाजपकडून दिला जाईल,’ असे अमित शहा (Amit Shah) म्हणाले आहेत. यावर आता राज्यातील राजकारणात भाजपबाबत द्वेश व्यक्त केला जात आहे. यावर आता आव्हाडांनी ट्वीट करत भाजप आणि अमित शहांवर टीकेचे आपटी बॉम्ब फोडले आहेत.

काय म्हणाले आव्हाड?

अमित शहांनी मध्यप्रदेश निवडणुकांसाठी देवाचे दर्शन दाखवण्याचे आमिष दाखवून सत्ता बळकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याबाबत वक्तव्य केले असून आव्हाड म्हणाले की, ‘भाजपासाठी प्रभू श्री राम हे फक्त पॉलिटिकल टूल आहेत बाकी काही नाही. श्रीरामाला यांनी फक्त त्यांच्या राजकारणासाठी वापरलंय. शाह यांचं हे विधान देशभरातील, जगभरातील तमाम हिंदूंचा अपमान करणारं आहे. संपूर्ण जगात हिंदू बांधव पसरलेत. फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन, मध्य प्रदेशच्या जनतेला मोफत दर्शन घडविण्याचे आमिष दाखवलं जातंय. वास्तविक पाहता, श्रद्धा हा लोकांच्या आस्थेचा विषय आहे. त्याचा असा बाजार मांडणं हे जगभरातील रामभक्तांच्या श्रद्धेशी, भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे’

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी