विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील निवडणूक रंगात येवू लागली आहे(Kapil Patil Betrayed The Alliance). शिवसेनेकडून ज. मो. अभ्यंकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. विद्यमान शिक्षक आमदार कपिल पाटील हे यावेळी निवडणूक लढविणार नाहीत. कपिल पाटील यांच्याऐवजी शिक्षक भारतीकडून सुभाष मोरे हे निवडणुकीच्या रिंगणार उतरले आहेत. सुभाष मोरे यांची ‘लय भारी’ने नुकतीच मुलाखत घेतली होती. सुभाष मोरे व कपिल पाटील यांच्यामार्फत ज. मो. अभ्यंकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.ज. मो. अभ्यंकर हे यापूर्वी शालेय शिक्षण खात्यात उपसचिव या पदावर कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्या सहीने शिक्षणसेवक पदाचा शासकीय निर्णय जारी करण्यात आला होता. शिक्षकांचे मानसिक व आर्थिक खच्चीकरण करणारा हा निर्णय आहे. हा निर्णय ज. मो. अभ्यंकरांच्या सहीने काढण्यात आला होता, असा आरोप सुभाष मोरे व कपिल पाटील यांनी केला होता.सुभाष मोरे व कपिल पाटील यांच्या या आरोपाला ज. मो. अभ्यंकर यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. ज. मो. अभ्यंकर ह्यांना शिवसेना (उबाठा) गटा तर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांना जेव्हा जनतेची सहानुभूती उद्धव ठाकरे ह्यांच्यासोबत कायम आहे आणि ह्या सहानुभूतीचा लाभ हा प्रत्येक निवडणुकीत होणार असल्याचे अभ्यंकरांनी सांगितले.मोदींच्या काळात शासनाचे अनुदान मिळणार्या शाळा कश्या प्रकारे धोक्यात आलेल्या आहेत याचाही उलगडा सदर मुलाखतीत करताना ते दिसतात.मराठी-हिंदी शाळांना कसे मोडीत काढले जात आहे आणि ह्या शासनाच्या धोरणामुळे अनेक पिढ्या बर्बाद होत आहेत असे त्यांनी आमच्या संपादकांना सांगितले. शेवटी कपील पाटील आणि ज.म.अभ्यंकर हे महाविकास आघाडीचे घटक एकमेकांच्या विरोधात उभे आहेत असा प्रश्न विचारल्यावर कपील पाटील यांना आघाडीचा धर्म पाळला नाही असे अभ्यंकरांनी सदर मुलाखतीत सांगितले.
Teacher’s Election | कपिल पाटील यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही | भाग ३
शिवसेनेकडून ज. मो. अभ्यंकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. विद्यमान शिक्षक आमदार कपिल पाटील हे यावेळी निवडणूक लढविणार नाहीत. कपिल पाटील यांच्याऐवजी शिक्षक भारतीकडून सुभाष मोरे हे निवडणुकीच्या रिंगणार उतरले आहेत.