28 C
Mumbai
Thursday, September 14, 2023
घरराजकीयकर्नाटकमध्ये शतप्रतिशत काँग्रेस; बहुमताचा आकडा ओलांडला

कर्नाटकमध्ये शतप्रतिशत काँग्रेस; बहुमताचा आकडा ओलांडला

कर्नाटक विधासभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर निवडणुक प्रचारादरम्यान झाली. मात्र काँग्रेसने कर्नाटकात शतप्रतिशत बहुमत मिळवत भाजपच्या सत्तेला कर्नाटकातून दूर सारले आहे. कर्नाटकात 224 जागांसाठी निवडणुका झाल्या यामध्ये काँग्रेसने 128 जागांवर विजय मिळवला असून आठ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. सत्तास्थापनेसाठी 113 जागांचे बहुमत आवश्यक असते. काँग्रेसने हा आकडा ओलांडला असून स्पष्ट बहुमत मिळवले आहे.

कर्नाटक निडणुकीत भाजपने 60 जागा जिंकल्या असून 5 जागांवर आघाडीवर आहे, तर जनता दल सेक्युलर ने 19 जागांवर विजय मिळवला आहे, दोन अपक्ष उमेदवार निवडुण आले असून कल्याण राज्य प्रगती पक्ष आणि सर्वोदय कर्नाटक पक्षाने प्रत्येकी एका जागेवर उमेदवार निवडणुन आणले आहेत.

या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले असून 42.98 टक्के मते काँग्रेसला मिळाली आहेत. त्याखालोखाल भाजपला 35.91 टक्के तर जनता दल सेक्युलरला 13.3 टक्के मते मिळली आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ उमेदवार उभे केले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडुण आला नाही. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे देखील सर्वच उमेदवार पडले आहेत. बेळगावात काँग्रेसचे सर्वाधिक 11 उमेदवार निवडुण आले असून 7 उमेदवार भाजपचे विजयी झाले आहेत.
कर्नाटकात बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार होते. निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेते कर्नाटकात आले होते. काँग्रेसने डी. के. शिवकुमार आणि सिद्धरमय्या या दोघांच्या नेतृत्वाखाली निवडणुक लढली. राहुल गांधी यांनी या निवडणुकीत जोरदार प्रचार केला. प्रयांका गांधी देखील प्रचारासाठी कर्नाटकात तळ ठोकुन होत्या. सोनिया गांधी यांनी देखील कर्नाटकात हजेरी लावली होती. भाजप आणि काँग्रेसमध्ये दुरंगी सामना येथे पहावयास मिळाला. पण काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत भाजपला सत्तेतून खाली खेचले आहे.

हे सुद्धा वाचा

कर्नाटक विजय आणि ‘पप्पू’ टू ‘रागा’ व्हाया भारत जोडो पदयात्रा

आमच्या विजयात नरेंद्र मोदींचा 50 टक्क्यांचा वाटा; कर्नाटक विजयानंतर काँग्रेसची प्रतिक्रीया

शरद पवार तयारीला लागले; कर्नाटक निकालानंतर महाविकास आघाडीची बोलविली बैठक

कर्नाटक निवडणुक प्रचारातील मुद्दयांवरुन गाजली. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दल आणि पीएफआयवर बंदी घालू असे म्हटले होते. त्याचबरोबर 40 टक्के प्रकरण, स्थानिक मुद्दे, बेरोजगारी महागाई अशा अनेक मुद्यांवर काँग्रेसने जोरदार प्रचार केला. तर भाजपने बंजरंग बली, केरला स्टोरी अशा मुद्यांवर निवडणुक केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदारांनी भाजपच्या परड्यात मते न टाकता काँग्रेसला विजयी केले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी