27 C
Mumbai
Thursday, August 31, 2023
घरराजकीयसिलेंडरची पूजा: कर्नाटकातल्या अनोख्या स्टाईलच्या मतदानामुळे भाजपची कोंडी?

सिलेंडरची पूजा: कर्नाटकातल्या अनोख्या स्टाईलच्या मतदानामुळे भाजपची कोंडी?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचे सिलिंडर पूजनाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज (10मे) संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान होत आहे. गेले काही दिवस प्रचाराची मैदानं गाजवणारे काँग्रेस, भाजप व धर्मनिरपेक्ष जनता दल या प्रमुख पक्षांचे नेते आज मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. त्याच वेळी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

कर्नाटक काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांचे हे व्हिडिओ आहेत. कर्नाटकातील काँग्रेसचे कार्यकर्ते व सहानुभूतीदार मतदार हे मतदानाला जाण्याआधी घरातील गॅस सिलिंडरची पूजा आणि आरती करत आहेत. खरतरं या सगळ्याचा संबंध 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचाराशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीचा प्रचार करताना घरगुती गॅस सिलिंडरची महागाई हा मुद्दा उचलला होता. काँग्रेसच्या काळात महागाई किती वाढलीय हे मोदी लोकांना सांगत होते. मतदानाला जाण्याआधी आपापल्या घरच्या सिलिंडरला नमस्कार करून जा, असं आवाहन त्यांनी केलं होतं.

दरम्यान आता काँग्रेसनं पंतप्रधान मोदी यांच्या त्या प्रचाराचा आता भाजपच्याच विरोधात वापर करून घेतला आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते सिलिंडरचं पूजन करून मतदान करत आहेत. यामुळं काँग्रेसची जोरदार चर्चा होत आहे. मुख्यत: ही कृती थेट प्रचारात मोडत नसल्यामुळं भाजपला या प्रकाराची निवडणूक आयोगाकडं तक्रारही करणं अवघड होऊन बसलं आहे. त्यामुळे आता चारही बाजूंनी भाजपची कोंडी झाली आहे.

कर्नाटकात तर काही ठिकाणी काँग्रेसच्या बूथवर सिलिंडर ठेवलेले आहेत. त्यामुळे मतदार देखील या सिलिंडरला नमस्कार करून मतदानास जात आहेत. हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यात कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांचाही एक व्हिडिओ आहे. मतदानाला जाण्याआधी भर पत्रकार परिषदेत ते सिलिंडरला नमस्कार करत असल्याचं दिसत आहेत. काँग्रेसच्या या कृतीची जोरदार चर्चा सध्या देशात आहे.

Karnataka Cylinder Puja :

हे सुद्धा वाचा : 

जितेंद्र आव्हाडांनी थेट भाजपला आव्हान देत ‘या’ मराठी चित्रपटाचे मोफत शो लावलेत

मुख्यमंत्री साहेबांनी काही खोके बेळगावला पाठवले; संजय राऊतांचा गंभीर आरोप

अजितदादांमुळेच मी..; त्या विधानानंतर अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा

Karnataka Cylinder Puja, Karnataka people worship cylinders before voting, BJP, Congress, NCP, Shiv Sena, AAP, karnataka assembly election 2023, karnataka

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी