32 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रArvind Kejriwal : केजरीवाल म्हणाले नोटांवर देवी लक्ष्मी, गणपतीचे फोटो छापा; भाजप...

Arvind Kejriwal : केजरीवाल म्हणाले नोटांवर देवी लक्ष्मी, गणपतीचे फोटो छापा; भाजप आणि काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पत्रकार परिषदेतून भारतीय चलनी नोटांवर लक्ष्मी देवी आणि श्रीगणेशाचे फोटो छापण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पत्रकार परिषदेतून भारतीय चलनी नोटांवर लक्ष्मी देवी आणि श्रीगणेशाचे फोटो छापण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. केजरीवाल म्हणाले की, दिवाळीत लक्ष्मीपुजनावेळी माझ्या मनात या भावना आल्या. त्यामुळे माझे सरकारला आवाहन आहे की, भारतीय नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटा छापावा. नोटांवरील महात्मा गांधीजींचा फोटो तसाच राहू द्यावा. पण दुसऱ्या बाजूला या देवतांचे फोटो छापावेत. जेणेकरून अर्थव्यवस्थेला या देवतांचा आशिर्वाद मिळेल. इंडोनेशियात २० हजार रूपयांच्या नोटांवर गणपतीचा फोटो आहे. मग भारतात असे का घडू शकत नाही? असा सवालही त्यांनी केला. त्यावरून आता सर्व स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तर भाजपने (bjp) आणि कॉँग्रेसने (Congress) केजरीवाल यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे.

केजरीवाल यांच्या वक्तव्यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा (sambit patra) म्हणाले की, ”हा तोच माणूस आहे ज्याने अयोध्येत जाऊन केलेली प्रार्थना भगवान राम स्विकार करणार नाहीत, असे म्हणत अयोध्येत जाण्यास नकार दिला होता. एवढेच नाही तर केजरीवाल असे देखील म्हणाले होते की, काश्मिरी पंडीत खोटे बोलतात.”
भाजपचे खासदार मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांनी देखील केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले आम आदमी पक्षाचे मंत्री, गुजरात प्रमुख आणि आपच्या नेत्यांनी हिंदू देवतांना शिव्या दिल्या आहेत, आणि तरी देखील ते पक्षात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पक्ष नवे नाटक करत आहे. राम मंदिराला विरोध करणाऱ्यांनी नवा मुखवटा धारण केला आहे.
हे सुद्धा वाचा :
Uber taxi : उबेर टॅक्सी चालकाच्या बेजबाबदारपणामुळे विमान चुकले; कोर्टाने कंपनीला ठोठावला दंड
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार अयोध्या दौऱ्यावर
MNS Ameya Khopkar : मुस्लिमविरोधी वक्तव्य करणाऱ्या अमेय खोपकरांना हिंदूंनी फटकारले
— कॉंग्रेस नेत्यांची टीका
भाजपसोबतच कॉँग्रेसने देखील केजरीवाल यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. कॉँग्रेसचे नेते संदीप दिक्षित (Sandeep Dikshit) म्हणाले की, आम आदमी पक्ष हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बी टीम आहे. आम आदमी पक्षाला कसलाच विचार नाही. त्यांना केवळ मतांचे राजकारण करायचे आहे. जर ते पाकिस्तानात गेले तर तेथे देखील असे म्हणतील की, मी पाकिस्तानी आहे, त्यामुळे मला मत द्या. तर कॉँग्रेसचे नेते सलमान अनीस सोज यांनी केजरीवाल यांच्याकडे मागणी केली आहे की, जर लक्ष्मी आणि गणेश समृध्दी घेऊन येऊ शकतात तर आपल्याला हे ठरवावे लागेल की आपल्याया आणखी समृद्धी मिळायला हवी आणि नोटांवर अल्लाह, येशू, गुरू नानक, बुद्ध आणि महावीर यांचे देखील फोटो छापावेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी