30 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरराजकीयKirit Somaiya : किरीट सोमय्यांचा पुढचा 'टार्गेट' आदित्य ठाकरे?

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा पुढचा ‘टार्गेट’ आदित्य ठाकरे?

मुंबईच्या मढ येथील एक हजार कोटींच्या स्टुडिओ घोटाळ्यांसंबंधी पुर्तता करण्यासाठी भाजपनेते किरीट सोमय्या यांच्यासह गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, योगेश सागर आणि इतर काही पदधिकाऱ्यांनी मढ या ठिकाणी आज पाहणी केली.

राज्यातील भ्रष्टाचाराचे घोटाळे बाहेर काढण्याचे कंत्राट सध्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतले आहे, परिणामी विरोधी गटातील अनेकांच्या मागे ईडीची पीडा लागली आहे. सध्या महाविकास आघाडीतील माजी मंत्री आणि काॅंग्रेस नेते अस्लम शेख यांचा घोटाळ्यामध्ये पुढचा नंबर लागल्याचे दिसत आहे. मुंबईच्या मढ येथील एक हजार कोटींच्या स्टुडिओ घोटाळ्यांसंबंधी पुर्तता करण्यासाठी भाजपनेते किरीट सोमय्या यांच्यासह गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, योगेश सागर आणि इतर काही पदधिकाऱ्यांनी मढ या ठिकाणी आज पाहणी केली. या स्टुडिओ घोटाळ्यासंदर्भात सोमय्यांनी अस्लम शेख यांच्यावर काही गंभीर आरोप सुद्धा केले आहेत, याप्रकरणी आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण मंत्रालयाने याबाबत परवानगी दिल्याचे म्हणत सोमय्या यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपात अनेक प्रश्न विचारून अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणले आहे. मुंबईतील मढ येथील परिसरात स्मशान भूमी उभारण्यास नाकारण्यात आले, मग स्टुडिओ उभारण्यास कशी काय परवानगी मिळाली, स्टुडिओ उभारल्यानंतर सुद्धा सेट लावण्यासाठी केवळ सहा महिन्यांची तात्पुरती परवानगी देण्यात आली होती परंतु तरीसुद्धा तिथे अजूनही बांधकाम तसंच राहिल्याचे दिसून येत असल्याचे म्हणत तिथे 1000 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा…

Ganeshotsav 2022 : बाप्पाची पूजा करा ‘या’ शुभ मुहूर्तावर

Operation Lotus : महाराष्ट्रानंतर आता दिल्लीचे ‘केजरीवाल सरकार’ भाजपच्या रडारवर

Ghulam Nabi Azad Resigns : देशात काँग्रेसला मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसला रामराम

2021 च्या जुलै महिन्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी सदर परिसराची पाहणी केली होती. जेव्हा या परिसराची पाहणी केली तेव्हाच त्या स्टुडिओ संदर्भातील बांधकामाची मुदत संपलेली होती. 2019 साली या ठिकाणी कोणतेच बांधकाम नव्हत, परंतु हे रातोरात बांधकाम करून येथे स्टुडिओ उभारण्यात आला. 2021 च्या ठाकरे आणि शेख यांच्या भेटीनंतर मुदत संपल्याचे लक्षात घेत सदर बांधकाम काढण्यात आले नाही, किंबहुना तिथे तात्पुरत्या बांधकामा ऐवजी पक्क बांधकाम करण्यात आले आहे, त्यामुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. दरम्यान या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीच किरीट सोमय्या यांनी केली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी