28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयभाजप नेते किरीट सोमय्या सोमवारी कोल्हापुरात; पत्रकार परिषदेत काय बोलणार ?

भाजप नेते किरीट सोमय्या सोमवारी कोल्हापुरात; पत्रकार परिषदेत काय बोलणार ?

भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सोमवारी (दि. १६) रोजी कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर नुकतेच सक्तवसुली संचलनालय (ED) ने छापे घातले होते. त्यापार्श्वभूमीवर सोमय्या कोल्हापुरात काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे. (Kirit Somaiya on a visit to Kolhapur on Monday) रविवारी(दि.१५) रोजी रात्री ते कोल्हापुरला रवाना होणार आहेत. सोमवारी सकाळी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतल्यानंतर भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याला ते हजेरी लावणार असून त्यानंतर सोमय्या पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर ईडीने नुकतेच छापे टाकले होते.

महाविकास आघाडीचे सरकार असताना सन २०२१ मध्ये किरीट सोमय्या यांनी तत्कालीन सरकारमध्ये मंत्री असणारे हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यासंबंधी कागदपत्रे देखील त्यांनी आय़कर विभाग आणि ‘ईडी’ला सादर केली होती. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा देखील दाखल केला होता.

हे सुद्धा वाचा

आता नवीन काय ते सायंकाळी छापेमारी संपल्यानंतर कळेल : हसन मुश्रीफ

किरीट सोमय्यांचा ट्विटरवर आणखी एक बॉंम्ब , हसन मुश्रीफांचा मुलगा, जावई आणि इतर 7 जणांविरुद्ध एफआयआर करणार

हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्यांवर केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर चंद्रकांत पाटलांचा पलटवार

महाविकास आघाडीचे सरकार असताना सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, शिवसेनेचे आमदार अनिल परब, राष्ट्रवादीचे तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांच्यावर देखील सोमय्या यांनी आरोप केले होते. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत काही दिवस कारागृहात होते. तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक अद्याप देखील कारागृहात आहेत.

३१ डिसेंबर २०२२ रोजी सोमय्या यांनी ट्विट करत उद्यापासून सुरू होणाऱ्या नविन वर्षात ठाकरे १९ बंगले, अनिल परब, हसन मुश्रीफ, अस्लम खानचे स्टुडीओ किशोरी पेडणेकर एसआरए सदनिका, मुंबई महापालिका, यांचा घोटाळ्याचे हिशोब पूर्ण करणार असे ट्विट केले होते. त्यानंतर नविन वर्षात पहिल्यांदा ११ जानेवारी रोजी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर ईडी ने छापे घातले होते. दरम्यान सोमवारी किरीट सोमय्या कोल्हापुरात जाणार असून ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी