28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
HomeराजकीयKirit Somayya : किरीट सोमय्या स्वत:च्या बालेकिल्ल्यातच भाजपकडून बेदखल!

Kirit Somayya : किरीट सोमय्या स्वत:च्या बालेकिल्ल्यातच भाजपकडून बेदखल!

ज्यांच्यावर आरोप केले तीच मंडळी भाजपमध्ये येऊ लागल्याने गोची झालेले भाजप नेते किरीट सोमय्या आता स्वत:च्या बालेकिल्ल्यातच भाजपकडून बेदखल झाले आहेत. मुलुंड सेवा संघ व मुलुंड महिला बचत गटातर्फे आयोजित कोकण महोत्सवाच्या प्रसिद्धीत सोमय्यांना कुठेही स्थान देण्यात आलेले नाही. या महोत्सवाच्या होर्डिंग व बॅनरवरुन भाजपने सोमय्यांना गायब केले आहे.

ज्यांच्यावर आरोप केले तीच मंडळी भाजपमध्ये येऊ लागल्याने गोची झालेले भाजप नेते किरीट सोमय्या आता स्वत:च्या बालेकिल्ल्यातच भाजपकडून बेदखल झाले आहेत. मुलुंड सेवा संघ व मुलुंड महिला बचत गटातर्फे आयोजित कोकण महोत्सवाच्या प्रसिद्धीत सोमय्यांना कुठेही स्थान देण्यात आलेले नाही. या महोत्सवाच्या होर्डिंग व बॅनरवरुन भाजपने सोमय्यांना गायब केले आहे.

मुलुंड पूर्वेतील तालुका क्रीडा संकुलात मुलुंड सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी या कोकण महोत्सवाचे आयोजन केले आहे. 23 नोव्हेंबर रोजी सुरू झालेला हा महोत्सव 4 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यात आज, रविवारी, सायंकाळी सात वाजता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील यांच्यासह अभिनेत्री ईशा कोप्पीकर हे भेट देणार आहेत. मुलुंडमधील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून सोशल मीडियावर त्याची जाहिरातबाजी सुरू आहे. त्यांच्या सर्व प्रसिद्धी साहित्यात सोमय्या कोठेही दिसत नाहीत.

किरीट सोमय्या ही आता भाजपची अडचण होत आहे की काय, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध यांची “सिलेक्टीव्ह लढाई” आता सर्वांनाच ठावूक झाली आहे. उठसूठ आरोप-आरोप खेळणारे सोमय्या आता कमालीचे थंड पडले आहेत. भावना गवळी, आनंद अडसूळ, अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव यांच्याविरोधात कायम शिमगा करणारे सोमय्या आता ही मंडळी भाजपच्या दावणीला गेलेल्या शिंदे गटात जाताच चिडीचूप झाले आहेत.
Kirit Somaiya ousted from BJP in his own stronghold
कृपाशंकरसिंह, नारायण राणे यांच्यासारखे अनेक नेते आज पावन झाले आहेत. सोमय्या यांची “हिसाब तो देना पडेगा,” ही नाटकी टेप आता वाजायची बंद झाली आहे. मात्र, भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांना आपापल्या मतदारसंघात, “सोमय्या आता गप्प का, आता कुठे गेल्या भ्रष्टाचाराच्या फायली?” असा हिशेब नागरिक मागू लागले आहेत. त्यामुळे भाजप नेते कमालीचे वैतागले आहेत. सोमय्या नावाची ब्याद त्यांना आता नकोशी झाली आहे. शिवाय, त्यांच्या अतिरेकामुळे व काही भूमिकांमुळे मराठी मतदार दुरावण्याची भीती भाजपाला वाटू लागली आहे. याशिवाय, भाजपमध्ये अंतर्गत राजकारणालाही उत आल्याचे सांगितले जात आहे. परप्रांतीय तसेच गुजराती विरोधात मराठी असा नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. अनेक मराठी भाजप कार्यकर्ते सोमय्या नकोच, अशी भूमिका घेत आहेत.

Kirit Somaiya ousted from BJP in his own stronghold

मुळात उठसूठ इतरांवर आरोप करणारे सोमय्या हे तरी कुठे धुतल्या तांदळागत आहेत, असा सवाल केला जात आहे. सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील यांच्याविरोधात अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. ते दोषमुक्त झालेले नाहीत. त्यांनी तूर्तास जामीन मिळवला आहे. एकूणच किरीट सोमय्या ही आता भाजपची राजकीय अडचण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमय्या यांचा भ्रष्टाचारविरोधी लढा वैगेरे सब झूठ आहे. 2019 मध्ये शिवसेनेने तिकीट मिळू न दिल्याने मंत्रीपद नाही, की आमदारकी-खासदारकी नसलेले सोमय्या हे शिवसेना द्वेषातून पिसाळल्यागत करू लागले आहेत. 1975 च्या जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून राजकारणात पाऊल ठेवणारा हा माणूस पुढे ती विचारधारा सोडून भाजपात गेला. दोन टर्म खासदार राहिला; पण मंत्रीपद काही मिळालेच नाही. त्यात 2019 निवडणूक प्रचारात शिवसेना, मातोश्रीवर टीका करणाऱ्या सोमय्या यांना ईशान्य मुंबईतून तिकीट देण्यास शिवसैनिकांनी जोरदार विरोध केला होता. भांडुप आणि विक्रोळीबरोबरच या संपूर्ण मतदारसंघातच सेनेची ताकद आहे.
हे सुद्धा वाचा :

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांची घोषणा; आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारणार!

IAS, IPS दुष्काळी भागात घडणार; प्रभाकर देशमुखांचा कल्पक उपक्रम!

Lay Bhari : ‘लय भारी’च्या संपादकपदी विक्रांत पाटील यांची नियुक्ती !

खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी तर सोमय्या यांना उमेदवारी दिली तर अपक्ष म्हणून लढण्याची धमकी दिली होती. शेवटी रिस्क टाळण्यासाठी भाजपने ऐनवेळी सोमय्या यांचा पत्ता कापला व मुलुंडचे नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. शिवसेनेची ताकद असलेल्या या सुरक्षित मतदारसंघात कोटक दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले. या निवडणुकीनंतर भाजपाने सोमय्या यांचे राज्यसभेत किंवा विधानपरिषदेतही पुनर्वसन केले नाही. त्यांच्या कारकीर्दीला ब्रेक लागला. त्यांना फायली घेऊन फिरत,आरोप करत सुटणे, याशिवाय दूसरा कोणताही उद्योग उरला नाही. दुसरीकडे, शिवसेनेच्या बळावर निवडून आलेल्या मुलुंड परिसरातील भाजप नेत्यांना आता शिवसेनेला किंवा मराठी माणसांना दुखवायचे नाही. आगामी निवडणुका पाहता ते राजकीय फायद्याचे ठरणार नाही, हे भाजपाचे स्थानिक नेते जाणून आहेत. त्यामुळे त्यांनी सोमय्या यांचे लोंढणे तूर्तास बाजूला ठेवणे पसंद केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी