भाजपाचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या कथित व्हिडिओ वरुन सध्या महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. किरीट सोमय्या यांच्या या व्हिडिओवरून काल विधिमंडळात देखील पडसाद उमटले. विरोधकांनी या व्हिडिओवरून जोरदार टीका केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडिओ बद्दल चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. वैयक्तिक हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा मी निषेध करतो. अस म्हणत त्यांनी ट्वीट केले आहे. त्यांच्या या ट्वीट वर त्यांची मुलगी नताशा आव्हाड हिने ट्वीट करत सोमय्या बाबतचा एक अनुभव सांगितला आहे.
नताशा आव्हाड हिने ट्विट करत म्हटले आहे की, बाबा,जेव्हा तुम्ही कोविडमध्ये सिरियस होतात,तेंव्हा हेच किरीटजी तुम्ही आजारी नाहीतच,नाटक करत आहात असे खोटे आरोप करत पुरावा मागत होते.तेंव्हा आपल्या परिवाराने यांच्यामुळे खूप मानसिक त्रास भोगले. तरी आज किरीटजींच्या खाजगी आयुष्याच्या हक्कांसाठी उभे राहिलात हे अभिमानास्पद आहे!
बाबा,जेव्हा तुम्ही covid मध्ये सिरियस होतात,तेंव्हा हेच किरीटजी तुम्ही आजारी नाहीतच,नाटक करत आहात असे खोटे आरोप करत पुरावा मागत होते.तेंव्हा आपल्या परिवाराने यांच्यामुळे खूप मानसिक त्रास भोगले. तरी आज किरीटजींच्या खाजगी आयुष्याच्या हक्कांसाठी उभे राहिलात हे अभिमानास्पद आहे! https://t.co/HGWmZunrRo
— Natasha Awhad (@NatashaASpeaks) July 18, 2023
राजकारणाचा स्तर खासावला असून वैयक्तिक हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे या प्रकाराचा मी निषेध करतो. आता एका व्यक्तीबद्दल जे काही फिरत आहे आणि लोक ज्याच्याबद्दल टाळ्या देत आहेत; हे काही योग्य नाही असं मला वाटतं. थोडीशी संवेदनशीलता राजकारण्यांनी बाळगायला हवी. असे आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
मी 1995 साली शरद पवार साहेबांकडे बीजेपीच्या एका मोठ्या नेत्याचा सातबारा घेऊन गेलो होतो. तो सातबारा एका भलत्याच महिलेच्या नावावर होता. शरद पवार साहेबांना मी सांगितले की, साहेब ह्या सातबाऱ्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. साहेबांनी सातबारा माझ्या हातातून घेतला आणि ड्रॉवरमध्ये टाकला आणि मला म्हणाले जितेंद्र राजकारणामध्ये राजकीय विचारांचे मतभेद असतात, त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये तो काय करतो याच्याशी आपल्याला काहीएक देणंघेणं नाही. असा विचार पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये कधीच करत जाऊ नकोस. आपण एवढं खाली घसरायचं नाही.
हे सुद्धा वाचा:
अमली पदार्थ गैरव्यवहारात सहभागी अधिकारी बडतर्फ केला जाईल – गृहमंत्री फडणवीस
अजित पवारांचा वाढदिवस राज्यात ‘अजित उत्सव’ म्हणून साजरा करणार : सुनील तटकरे
अखेर ठरलं! 2024 च्या निवडणुकीसाठी विरोधी युतीचे नाव INDIA,जाणून घ्या याचा अर्थ