27 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरराजकीय'अनिल परब यांनी साई रिसॉर्टप्रकरणी 5 कोटींचा दंड भरला नाही'

‘अनिल परब यांनी साई रिसॉर्टप्रकरणी 5 कोटींचा दंड भरला नाही’

अनिल परब यांना या रिसॉर्ट प्रकरणी 5 कोटी 50 लाखांचा दंड 15 दिवसांमध्ये भरण्याचे आदेश पर्यावरण मंत्रालयाने 22 सप्टेंबर रोजी दिले होते. मात्र परब यांनी अद्यापही हा दंड भरला नसल्याचे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.

दापोली येथील समुद्र किनाऱ्यावरील साई रिसॉर्ट प्रकरणी भाजप नेते किरिट सोमय्या यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. त्यावरुन अनिल परब आणि सोमय्या यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अनिल परब यांना या रिसॉर्ट प्रकरणी 5 कोटी 50 लाखांचा दंड 15 दिवसांमध्ये भरण्याचे आदेश पर्यावरण मंत्रालयाने 22 सप्टेंबर रोजी दिले होते. मात्र परब यांनी अद्यापही हा दंड भरला नसल्याचे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे. किरीट सोमय्या यांनी महविकास आघाडी सरकारच्या काळात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाराचे आरोप केले होते. खासदार संजय राऊत यांच्यावर देखील त्यांनी पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप केले होते. त्यानंतर संजय राऊत यांना सुमारे १०० दिवस तुरुंगवास भोगावा लागला, संजय राऊत हे नुकतेच जामीनावर बाहेर आले असून, न्यायालयाने ईडीला याप्रकरणी खडे बोल सुनावले आहेत.

सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर देखील साई रिसॉर्टप्रकरणी आरोप केले आहेत. ईडीने देखील परब यांची याबाबत चौकशी केली असून, कोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. हे रिसॉर्ट अनधिकृत असून पर्यावरण खात्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर केले आहेत.

दरम्यान सोमय्या यांनी आज एक ट्विट करुन अनिल परब यांच्यावर पून्हा तोफ डागली आहे. सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पर्यावरणाचे नुकसान केल्याप्ररणी समुद्र किनाऱ्यावर रिसॉर्ट बांधल्याप्रकरणी सीआरझेड नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पर्यावरण मंत्रालयाने 5,05,50,000 रुपये दंड आकारला, हा दंड भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत 22 सप्टेंबर रोजी आदेश दिला होता. मात्र परब यांनी अद्याप दंड भरला नाही.

हे सुद्धा वाचा
नवल : ‘इस्रायलमध्येही विकृत जितेंद्र आव्हाड !’
RBI लाँच करणार डिजिटल चलनाचा पायलट प्रोजेक्ट
भारतीय संघासमोर बांग्लादेश गारद !, पहिल्याच दिवशी जयस्वालची खेळी यशस्वी
साई रिसॉर्ट प्रकऱणी अनिल परब यांना न्यायालयाने नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. हा निकाल परब यांच्यासाठी मोठा दिलासा देणारा ठरला. मात्र त्यानंतर आता परब यांच्यावर किरीट सोमय्या यांनी पून्हा नवे ट्विट करत घणाघात केला आहे. परब यांनी पाच कोटींचा दंड भरला नसल्याचे ट्विट केल्याने सोमय्या आणि अनिल परब वाद लवकर न थांबण्याची चिन्हे दिसत आहेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!