30 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरराजकीयKishori Pednekar : 'मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेच जिंकणार'

Kishori Pednekar : ‘मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेच जिंकणार’

मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुद्धा महापालिकेत शिवसेनेचाच भगवा फडकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पक्षाने जोरदार मोर्चा बांधणी. अनेक वर्षे महापालिकेच्या सत्तेत बसलेल्या शिवसेनेला यावेळी भाजप प्रतिस्पर्धी असणार असून त्यादृष्टीने भाजपच्या गोटात वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी माध्यमांशी संवाद साधला असून यावेळी सुद्धा मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधणाऱ्या भाजपनेते निलेश राणे (Nilesh Rane) यांना आतापर्यंत तुम्ही ज्यांना भ्रष्ट म्हणत होतात, त्या सर्वांनाच तुम्ही सोबत घेतले. त्याचं पहिले काय करणार, याचे उत्तर प्रथम द्यावे असा मिश्किल टोलाच पेडणेकर यांनी राणेंना लगावला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुद्धा महापालिकेत शिवसेनेचाच भगवा फडकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलामुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुद्धा महापालिकेत शिवसेनेचाच भगवा फडकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी पेडणेकर म्हणाल्या, सगळ्या बाजूंनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात रान पेटवले जात आहे. मात्र, मी तुम्हाला आज सांगते, की मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे हेच जिंकणार आहेत. तुम्ही अनेक पक्ष फिरुन येणार आणि नंतर ज्या पक्षात राहणार त्यांच्यासाठी गळे काढणार, असे म्हणून त्यांनी निलेश राणेंवर निशाणा साधला आहे.

हे सुद्धा वाचा…

Shiv Sena : शिवसेनेला मिळाली संभाजी ब्रिगेडची साथ

Asia Cup 2022 : आशिया चषकासाठी टीम इंडियाची खास जर्सी! ३ स्टार्सचे विशेष महत्व जाणून घ्या एका क्लिकवर

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा पुढचा ‘टार्गेट’ आदित्य ठाकरे?

निलेश राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेत किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या, नितेश राणे रात्रीच पत्र लिहतात की काय, हे मला समजत नाही. कारण मला एक प्रश्न पडतो की, आतापर्यंत तुम्ही ज्यांना भ्रष्ट म्हणत होतात, त्या सर्वांनाच तुम्ही सोबत घेतले. त्याचं पहिले काय करणार, याचे उत्तर प्रथम द्यावे असे म्हणून पेडणेकर यांनी राणेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. टार्गेट करणारे दुसरे आहेत असे म्हणून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.

आमच्याच काट्याने काटा काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही. मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करायची असेल तर त्यांनी खुशाल करावी पण हे विसरू नये की, 25 मधील 20 वर्ष ते आमच्या सोबतच होते. स्थायी समितीमध्ये भ्रष्टाचार होतो, असं ते म्हणतात मग यशवंत जाधवांना सोबत का घेतले, असे म्हणून भाजपच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान निलेश राणे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांना महापालिकेतील भ्रष्टाचाराची आठवण करून देत प्रशासक म्हणून यामध्ये लक्ष घालण्याचे सुचविले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी