28 C
Mumbai
Friday, August 5, 2022
घरराजकीयशिंदे गटाची क्रेझ वाढली! कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांचा लवकरच शिवसेनेला...

शिंदे गटाची क्रेझ वाढली! कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांचा लवकरच शिवसेनेला रामराम?

टीम लय भारी 

कोल्हापूर : कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी ‘ज्यांनी सोडून गेले ते बेन्टेक्स आणि राहिले ते चोविस कॅरेट सोने’ असे म्हणत शिंदे गटावर टीका केली होती, त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते, परंतु तेच मंडलिक आता शिवसेनेला लवकरच रामराम करीत शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर माध्यमांनी खासदार संजय मंडलिक यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या भूमिकेवर प्रश्न करीत ते नेमके कोणाच्या बाजूने असा सवाल केला.

यावेळी शिंदे गटात जाण्याच्या भूमिकेवर संजय मंडलिक म्हणाले, लेबर कमिटी मिटींगसाठी दिल्ली येथे गेलो असताना शिंदे गटात येण्यासाठी विचारणा करण्यात आली, त्यावेळी मतदार संघातील लोकांची मते लक्षात घेऊन त्यावर विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान मतदार संघातील लोकांना भेटून चर्चा केली, मेळावा घेतला आणि सगळ्यांकडून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा सूर उमटला, असे मंडलिक यांनी सांगितले.

दरम्यान शिवसेनेतील भूमिकेविषयी प्रश्न विचारला असता संजय मंडलिक म्हणाले, शिवसेनेचे मुख्यमंत्री असून सुद्धा कायम दुसऱ्या पक्षांना झुकते माप मिळाले असे म्हणून खंत व्यक्त केली. त्यामुळे संजय मंडलिक शिंदे गटात प्रवेश करणार हे जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.

शिवसेनेतून शिंदेगटात उत्सफुर्तपणे सहभागी होणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे त्यामुळे शिवसेनेची चिंता येत्या काळात आणखी गडद होणार अशा चर्चा सध्या ऐकायला मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा…

इंदौरहुन पुण्याला येणारी ‘महाराष्ट्र राज्य परिवहन’ची बस नर्मदा नदीमध्ये कोसळली; बसमध्ये 55 प्रवासी होते

‘काय त्या स्टोऱ्या, काय त्या फोकनाड्या, काय ती गरीबी, एकदमच वोक्केमंदी!’ शिंदेगटाविरोधात नरकेंचा हल्लाबोल

मुंबईला आज पुन्हा ‘ऑरेंज अलर्ट’, विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा ‘इन अॅक्शन’ मोडमध्ये

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!