32 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयमहादेव जानकरांचा दांडपट्टा आमदार राहुल कुल यांच्यावर चालणार !

महादेव जानकरांचा दांडपट्टा आमदार राहुल कुल यांच्यावर चालणार !

राष्ट्रीय समाज पक्षाच्या जोरावर आमदार होऊन भाजपच्या मांडीवर बसलेले आमदार राहुल कुल यांच्या नावाचा उल्लेख टाळून रासपचे अध्यक्ष महादेव जानकर त्यांच्या वाढदिवशीच जोरदार बरसले. कुल रासप सोडून भाजपमध्ये गेल्याने त्यांच्याविषयी जानकर दांडपट्टा चालवित आहेत.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या जोरावर आमदार होऊन भाजपच्या मांडीवर बसलेले आमदार राहुल कुल यांच्या नावाचा उल्लेख टाळून रासपचे अध्यक्ष महादेव जानकर त्यांच्या वाढदिवशीच जोरदार बरसले. कुल रासप सोडून भाजपमध्ये गेल्याने त्यांच्याविषयी जानकर दांडपट्टा चालवित आहेत.

माझ्यासोबत त्यांचं जमलं नसेल म्हणून ते भाजपमध्ये गेले असतील. आमच्या पक्षात असे कितीतरी कार्यकर्ते येतील आणि जातील, त्याचा पक्षावर काहीही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी म्हटले. रासपच्या कार्यकर्त्यांना तुम्ही निवडणूक लढविण्याची संधी देता, पण निवडून आल्यानंतर ते भाजपमध्ये जातात, असा प्रश्न विचारताच जानकर उसळले. आमदार राहुल कुल भाजपमध्ये गेले अथवा त्यांना नेण्यात आले, याचा विचार आम्ही करीत नाही. कार्यकर्त्यांच्या जीवावर चालणारा हा पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले.

माझ्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांकडून गोळा केलेला निधी पक्ष वाढीसाठी वापरला जातो. कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर हा पक्ष वाढत चालला आहे. जो कार्यकर्ता प्रामाणिकपणे पक्षासाठी निधी गोळा करतो, त्याला निवडणुकीत संधी मिळते. जो पक्षाला निधी देत नाही तो पुन्हा निवडून येत नाही, असे त्यांनी राहुल कुल यांचा उल्लेख टाळून सांगितले.

हे सुद्धा वाचा :

भाजपला सुरूंग लावण्यासाठी महादेव जानकर यांनी तयार केला रोडमॅप !

महादेव जानकरांना शरद पवारांविषयी आदर, महाराष्ट्र भूमीसाठी राजकारणात सक्रीय राहण्याचे केले आवाहन !

देशातील सायबर हल्ले रोखण्यासाठी व्हीजेटीआयमध्ये होतंय संशोधन..!

राष्ट्रीय समाज पक्षाची महाराष्ट्रात दोन कार्यालये आहेत. कर्नाटकातही पक्षाला सरकारने कार्यालय दिले आहे. राजधानी दिल्लीत पक्ष कार्यालय बांधण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी २ कोटी रुपयांची जागा घेतली असून २ कोटी रुपये बांधकामावर खर्च केला जाणार आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त १९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान मिळणारा निधी, दिल्लीतील पक्ष कार्यालयाच्या उभारणीसाठी वापरण्यात येणार असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी