29 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरराजकीयमहाराष्ट्र भाजपचा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप

महाराष्ट्र भाजपचा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप

टीम लय भारी

राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीसाठी एकत्र आलेले राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेना यांच्यात कायमच राजकीय वादंग पाहायला मिळतो. आरोप – प्रत्यारोपांच्या या खेळीत एकमेकांचे बनलेले हे राजकीय शत्रू पुन्हा पुन्हा नव्या मुद्यावर मत मांडत आपले म्हणणेच खरे करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. दरम्यान यावेळी महाराष्ट्र भाजपने शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर टीका केली आहे.

ष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची काल मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. त्यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पवार म्हणाले, सर्व यंत्रणांचा वापर करून भाजप राजकीय दहशत पसरवत आह, ज्याची विचारधारा नागपुरातून असल्याचे म्हणत त्यांनी हल्लाबोल केला.

शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. त्यांनी या वक्तव्याचा सोशल मिडीयावर चांगलाच समाचार घेतला आहे. पोस्टमध्ये भाजप म्हणतो, महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणांना दीड महिने तुरुंगात ठेवायला लावणारे @pawarSpeaks आज आराजकते बद्दल बोलत आहेत, असे म्हणून पवार यांच्या भूमिकेवर प्रश्न केला आहे.

राज्यातील सत्तांतराच्या नाट्यानंतर राजकीय पक्ष आणखीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे, त्यामुळे यापुढे कोण, कशी आपली भूमिका मांडणार कि हा वाद आणखी चिघळणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा…

बंडोबांचे सत्र संपेना! शितल म्हात्रे शिंदे गटात सामील

गुरूपोर्णिमेसाठी गुलाब खरेदी करताय? मग ‘हे’ वाचायलाच हवे

मुंबईकरांनो.. गरज असेल तरच घराबाहेर पडा, शहरात पावसाचा जोर वाढला

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!