30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयमहाराष्ट्र बजेट 2023: शिंदे-फडणवीस सरकारचं आज पहिलं बजेट; घोषणांचा वर्षाव होणार?

महाराष्ट्र बजेट 2023: शिंदे-फडणवीस सरकारचं आज पहिलं बजेट; घोषणांचा वर्षाव होणार?

महाराष्ट्राची 2023-24ची अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून सुरू होती. दरम्यान आज (ता.9 मार्च) महाराष्ट्राचा अधिकृत अर्थसंकल्प सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया होणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रासाठी शिंदे-फडणवीस सरकार यांच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे सर्वांचेच याकडे लक्ष लागून आहे. (Maharashtra budget 2023)

विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान फडणवीसांनी बुधवारी 8 मार्च रोजी महाराष्ट्र 2022-23 चे आर्थिक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार, 2022-23 मध्ये राज्याची अर्थव्यवस्था 6.8 टक्क्यांवर वाढण्याची शक्यता आहे, तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या 7 टक्के तुलनेत, 2021-22 मध्ये राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार 9.1 टक्क्यांनी झाला.

त्याचप्रमाणे बजेट सादरीकरणाच्या पूर्वसंध्येला शिंदे म्हणाले की, स्त्रियांच्या आणि मध्यमवर्गाच्या गरजा पूर्ण करण्यावर भर असेल. आम्ही उद्या आमची आश्वासने पूर्ण करीत आहोत. प्रत्येकजण त्यांच्यासाठी अर्थसंकल्प काय ठेवेल याचा अंदाज घेत आहे, असे शिंदे यांनी वृत्तसंस्थांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बजेटच्या सादरीकरणामध्ये घोषणांचा वर्षाव होईल असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

राज्यगीताने होईल सुरुवात…

मुख्यतः आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे नवीन राज्य गीत वाजवले जाईल, असे सरकारी प्रकाशनात म्हटले आहे. सभापती राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा निर्णय घेण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेली पाच विधेयके अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मांडली जातील, आणखी आठ विधेयके मंजूर होणे बाकी आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा : 

अधिवेशनात उपस्थित राहा, एकनाथ शिंदेंनी उद्धव गटातील आमदारांना बजावला व्हिप

फडणवीसांचे नव्याने ‘पुन्हा येऊ’!

ठाकरेंच्या ‘जीभ हासडून टाकू’ला एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी