29 C
Mumbai
Friday, May 5, 2023
घरराजकीययंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी 'या' विशेष तरतुदी

यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘या’ विशेष तरतुदी

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी आज गुरुवारी (दि. 9) राज्याचा 2023-2024 चा अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान काल नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. राष्ट्राची प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरवली जाते. त्यासाठी चौथे सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करण्याचे निर्देश शिंदे-फडणवीस सरकारने दिले. त्या अनुषंगाने मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी, माता सुरक्षित घर सुरक्षित, शक्तीसदन योजना अशा अनेक नव्या योजनांचा यंदाच्या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. (Maharashtra Budget 2023)

राष्ट्राची प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरवली जाते. त्यासाठी सर्वसमावेशक महिला धोरणात मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल, अशी घोषाण अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना केली. विशेषतः राज्यातील अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची रिक्त असलेली सुमारे वीस हजार पदे भरण्यात येतील.

राज्यात सुमारे ८१ हजार आशा स्वयंसेविका साडेतीन हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकेचे सध्याचे मानधन ३५०० रुपये तर गटप्रवर्तकांचे मानधन ४७०० रुपये आहे. या मासिक मानधनात प्रत्येकी दीड हजार रुपये एवढी वाढ करण्यात येत असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. गेल्यावर्षी जूनअखेरीस सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. मुख्यतः सुरक्षेचा प्रश्न लक्ष्यकेंद्रित करता महिलांच्या सुविधाजनक प्रवासासाठी आता महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबवण्यात येणार असून राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेतील तिकिटदरात महिलांना आता ५० टक्के सरसकट सवलत दिली जाणार आहे.

‘लेक-लाडकी’ योजना
राष्ट्राची प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरवली जाते. त्यासाठी आम्ही चौथे सर्वसमावेशक महिला धोरण राबवणार असून यासाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लेक-लाडकी’ योजनेची घोषणा अर्थसंकल्पातून केली केली. या योजनेंर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५००० रुपये, इयत्ता चौथी ४००० रुपये, सहावीत गेल्यावर सहा हजार रुपये आणि अकरावीत आठ हजार रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलीचे वय १८ जागा पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये दिले जातील.

‘शक्तीसदन’ योजना 
राज्यात नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे करण्याच्या हेतून दोन योजना एकत्र करुन ‘शक्तीसदन’ ही नवी योजना आखण्यात आली आहे. यात प्रामुख्याने शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिला आणि त्याचप्रमाणे लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी,  कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना लाभदायी उदयास आली आहे. या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा मिळणार आहेत.

माता सुरक्षित तर घर सुरक्षित
अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीस असेही म्हणाले की, केंद्र शासनाने अर्थसंकल्पात घोषित केल्याप्रमाणे मुंबई येथे युनिटी मॉलची स्थापना करण्यात येईल, त्यामध्ये बचत गटांना जागा देण्यात येईल. बचत गटांच्या माध्यमातून ३७ लाख ग्रामीण महिलांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहे. बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये बांबू क्लस्टर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापुरी चप्पल क्लस्टर हे विकसित करण्यात येईल. महिलांच्या आरोग्यासाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत चार कोटी महिला व मुलींची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येतील.

हे सुद्धा वाचा : 

अवघ्या १ रुपयात पिक विमा, शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला १२ हजार; शिंदे-फडवणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा

महाराष्ट्र बजेट 2023: शिंदे-फडणवीस सरकारचं आज पहिलं बजेट; घोषणांचा वर्षाव होणार?

बजेटमधली तुमच्या आमच्या कामाची बातमी : आता महिन्याला वाचू शकतील दहा हजार रुपये; कसे ते समजून घ्या …

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी