33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
HomeराजकीयMaharashtra Cabinet : अखेर मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला

Maharashtra Cabinet : अखेर मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला

शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण अद्याप कोर्टात प्रलंबित आहे आणि कोर्टाकडून सुद्धा पुढच्या पुढच्या तारखा देण्यात येत आहेत, त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचे सांगण्यात येत होते परंतु राज्यातील विरोधक आणि जनता यांच्यातील रोष आणखी वाढू नये म्हणून 15 ऑगस्ट पर्यंत हा मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम आटपण्यात येऊ शकतो असे सूत्रांकडून सांगण्यात आहे.

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन होऊन महिन्यापेक्षाही अधिक कालावधी उलटून गेला तरी मंत्रीमंडळ स्थापनेबाबत कोणताच निर्णय अद्याप होऊ शकला नाही. हाच मुद्दा वारंवार उपस्थित करत विरोधक आता चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या निर्णयासंदर्भात होणाऱ्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवाऱ्या सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. याच मुद्यावरून जनतेतील रोष सुद्धा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हाच मुद्दा लक्षात घेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे येथील नंदनवन बंगल्यावर भेटण्यास गेले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार यावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार यावर आज निश्चिती करून नव्या मंत्र्याना लवकरच शपथ दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विधीमंडळ परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान विधिमंडळ सचिवांनी सुद्धा तातडीने अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून खूप वेगाने घडामोडी सुरू झाल्या आहेत. ही संपूर्ण जय्यत तयारी लक्षात घेता मंगळवारी सकाळी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नंदनवन बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची चर्चा झाल्यानंतर दोघे राजभवन येथे राज्यपालांच्या भेटीस जाऊन मंत्रीमंडळ विस्ताराविषयी चर्चा करू शकतात अशी शक्यता सुद्धा आता वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

BEST : ‘बेस्ट’ने सुरु केली प्रवाशांसाठी नवी सुविधा

Nilesh Rane : निलेश राणेंनी दीपक केसरकरांना देऊ केली वाहनचालकाची नोकरी!

Eknath Shinde : ‘प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसीय दिल्ली दौरा आटपून कालच परतले आहेत. त्यामुळे यावेळी भाजप श्रेष्ठींकडून मंत्रीमंडळ विस्तारासाठी हिरवा कंदील मिळाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण अद्याप कोर्टात प्रलंबित आहे आणि कोर्टाकडून सुद्धा पुढच्या पुढच्या तारखा देण्यात येत आहेत, त्यामुळेच मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याचे सांगण्यात येत होते परंतु राज्यातील विरोधक आणि जनता यांच्यातील रोष आणखी वाढू नये म्हणून 15 ऑगस्ट पर्यंत हा मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम आटपण्यात येऊ शकतो असे सूत्रांकडून सांगण्यात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी