34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
HomeराजकीयMaharashtra Cabinet : दोन पाटलांना मंत्रीपदाचे आवतणं

Maharashtra Cabinet : दोन पाटलांना मंत्रीपदाचे आवतणं

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावांची मंत्रिपदासाठी निश्चिती करण्यात आली आहे, त्यामुळे हे दोन्ही नेते मुंबईच्या दिशेने तात्काळ रवाना झाले आहेत. मंत्रिमंडळात आणखी कोणाला मंत्रीपद मिळणार याची उत्सुकती आता राजकीय वर्तुळात कमालीची दिसून येत आहे.

शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहुर्त मिळाला असून मंगळवारी हा बहुप्रतिक्षित सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे यामध्ये कोणाकोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. भाजप पक्षश्रेष्ठींकडून अद्याप मंत्रीमंडळ विस्ताराला हिरवा कंदील मिळत नव्हता त्यामुळे शिंदे – फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या होत्या त्यामुळे विरोधी गटात नाराजी होती, तर दुसरीकडे जिल्ह्यांना पालकमंत्री, खात्यांत मंत्री नसल्याने जनतेत सुद्धा असंतोष वाढत होता. याच पार्श्वभूमीवर शिंदे – फडणवीस सरकारने मंत्रीमंडळ विस्तार कार्यक्रमाची निश्चिती करण्यात आली असून राधा कृष्ण विखे पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावावर पहिल्यांदा शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

मंत्रीमंडळ विस्ताराची तारीख ठरल्यामुळे राजकीय वर्तुळात लगबग वाढली आहे. सदर सोहळा उद्या म्हणजेच मंगळवारी पार पडणार असून सकाळी 11 वाजता सगळ्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी 10 ते 12 मंत्री यावेळी शपथ घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान आज रात्रीपर्यंत सुद्धा हा शपथविधी होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

Ramdas Kadam : बाळासाहेब असते तर शिवसेनेने कॉंग्रेससोबत युती केली असती का ? रामदास कदमांची आदित्य ठाकरेंवर आगपाखड

Maharashtra Cabinet : ‘अब्दुल सत्तार शिक्षणमंत्री होतील’

Maharashtra Assembly Session 2022 : विधिमंडळ अधिवेशन केलं ‘चिमुकलं’ !

मंत्रीमंडळ विस्तारात कोणाकोणाची वर्णी लागणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरले असले तरीही यामध्ये पहिल्या दोन जणांना मंत्रिपदासाठी बोलावणे धाडण्यात आले आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावांची मंत्रिपदासाठी निश्चिती करण्यात आली आहे, त्यामुळे हे दोन्ही नेते मुंबईच्या दिशेने तात्काळ रवाना झाले आहेत. मंत्रिमंडळात आणखी कोणाला मंत्रीपद मिळणार याची उत्सुकती आता राजकीय वर्तुळात कमालीची दिसून येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी