30 C
Mumbai
Saturday, September 16, 2023
घरराजकीयमंत्री अभ्यास न करता सभागृहात कसे येतात, विरोधकांसह भाजपचे आशीष शेलार देखील...

मंत्री अभ्यास न करता सभागृहात कसे येतात, विरोधकांसह भाजपचे आशीष शेलार देखील संतप्त

विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंगळवारी बार्टीच्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा विरोधकांनी तर वाचलाच, शिवाय भाजपचे आमदार आशीष शेलार यांनीही सत्ताधाऱ्यांना धारेवर घेतले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बार्टीमार्फत राबविण्यात येणारे कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुलभपणे सुरू करण्याबाबत आज तारांकित प्रश्न आशीष शेलार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड यांनी विचारला होता. त्यावर सरकारकडून या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल असून यावर नियमित सुनावणी सुरू आहे.

या प्रकरणी सरकारच्या वतीने राज्याचे महाअधिवक्ता बाजू मांडत असून प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील चिडले. त्यांनी तर, तुमचे मंत्री अभास न करता, सभागृहात कसे येतात; असा थेट प्रश्न विधानसभा अध्यक्ष यांना केला. त्यामुळे काहीवेळ सभागृहाचे वातावरण तापल्याचे निदर्शनास आले.

त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगितल्याने विरोधक चिडले. यावेळी जयंत पाटील यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ नाही. हा बार्तीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याचे सांगत, मंत्री महोदय गांभीर्यपूर्वक हा विषय घेत नसल्याचे बोलले. सर्व सदस्यांना समाधानकारक उत्तर अपेक्षित आहे. तुमचे मंत्री अभास न करता सभागृहात कसे येतात, असा सवालही पाटील यांनी केला.

हे सुद्धा वाचा
नियतीचा खेळ! जीपला भरधाव कंटेनरची धडक, शाळकरी मुलांच्या मृत्यूनं काळीज पिळवटलं…
पुढील 3 ते 4 दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे! पावसाबाबत वाचा हवामान खात्याचा नवीन अपडेट
…10-15 दिवसांनी जाणीव होते आपली विकेट गेली; जितेंद्र आव्हाड यांनी साधला निशाणा  

मंत्र्यांनी अभ्यास करून सभागृहात यावे याबाबत अध्यक्ष यांनी मंत्र्यांना ताकीद द्यावी, असे काँग्रेसचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. विरोधक बार्टीच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्यावर भाजपचे सदस्य आशीष शेलार हे देखील आक्रमक झाले. २० हजार विद्यार्थ्यांचे आयुष्य वाया जात असताना, सरकार हे प्रकरण गांभीर्यपूर्वक घेत नाही, असा आरोप आशीष शेलार यांनी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी