32 C
Mumbai
Tuesday, December 5, 2023
घरराजकीयमनसे गुजरात्यांच्या गालावर वळ उठवणार !

मनसे गुजरात्यांच्या गालावर वळ उठवणार !

मराठी अस्मिता जगवण्यासाठी मनसे सतत राज्याच्या जनतेसाठी सदैव तत्पर असते. हे याआधी देखील बऱ्याचदा पाहिलंही असेल. परप्रांतीय रोजगारासाठी मुंबई, महाराष्ट्रात येतात. तर काही परप्रांतीयांचे महाराष्ट्रात छोटे – मोठे उद्योगधंदे आहेत. मराठी माणसांनी माणुसकी दाखवूनही परप्रांतीयांकडून मराठी माणसांचे कंबरडे मोडले जात आहे. मराठी माणसांना अरेरावी सहन करावी लागत आहे. तर बऱ्याचदा महाराष्ट्रात राहून देखील परप्रांतीय मराठी न बोलण्याचा हट्ट धरतात. अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. यापैकी तृप्ती देवरुखकर प्रकरणाला न्याय मिळाल्यानंतर तृप्ती यांच्याच सोसायटीला लावलेला गुजराती फलक काढण्यात आला आहे. याबाबत एका मनसे पदाधिकाऱ्याने आपल्या X अकाऊंटवर परप्रांतीयांच्या त्रासाला कंटाळून गुजरात्यांविरोधात शाब्दिक हल्ला केला आहे.

काही दिवसांपूर्वी तृप्ती देवरुखकर यांचं प्रकरण घडलं होतं. या प्रकरणात तृप्ती यांना एका गुजरात्याने घर देण्यास नकार दिला होता. त्यावेळेस त्यांनी विडिओच्या माध्यमातून आपल्याला झालेल्या त्रासाबाबत माहिती दिली. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाची होत असलेली अहवेलणा यांची दखल मनसेने घेतली. त्यानंतर याप्रकरणाला राजकीय रंग येऊ लागला. मात्र हा मराठी माणसाच्या फायद्याचा होता. त्यानंतर आता तृप्ती यांच्याच शिवसदन सोसायटी येथील फलक हा इंग्रजी भाषेत होता. यावेळी समाजसुधारक राकेश गायकवाड यांनी सोसायटीत जाऊन मराठीत नाव लिहून इंग्रजी नावांचा निषेध केला. आता मनसेच्या युवा पदाधिकाऱ्यांनी याबाबत सोशल मिडियाच्या माध्यमातून परप्रांतीयांवर हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा 

पीक विमा भरपाई करा नाहीतर… कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी दिला सूचक इशारा

राष्ट्रवादीने पाडला मराठीचा मुडदा

हसन मुश्रीफ, तानाजी सावंत यांचा राजीनामा घेण्याची कॉँग्रेस शिष्टमंडळाची राज्यपालांना विनंती

 काय लिहिल सोशल माध्यमावर?

मनसे युवा पदाधिकारी नीलेश भोसले यांनी आपल्या x या अकाऊंटवर शिवसदन सोसायटीतील इंग्रजी पाटी आणि तृप्ती देवरुखकर यांच्या प्रकरणाबात परप्रांतीयांना टोला लगावला आहे. “आधी मराठी माणसाला घर नाकारले,मग गुजरातीत जाहिराती…. या महाराष्ट्रात जर मराठी भाषा आणि माणसाचा पुन्हा अपमान करण्याचे कोणी प्रयत्न तरी केला तर याद राखा गाठ मनसेशी आहे….आता फक्त समजावले ,नंतर फक्त गालावर वळच उठतील…” असे ट्वीट केलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी