29 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
HomeराजकीयMaharashtra Politics : भाजपची नवनियुक्ती! महत्त्वाच्या पदांसाठी निवडले 'आक्रमक' चेहरे

Maharashtra Politics : भाजपची नवनियुक्ती! महत्त्वाच्या पदांसाठी निवडले ‘आक्रमक’ चेहरे

राज्यातील सत्ताबदल आणि मुंबई महानगर पालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरवात केली असून भाजप नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागताच त्यांचे पद रिक्त झाल्याने त्यांच्या जागेवर महत्त्वाच्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्याने राजकारणातील सगळी सूत्रेच बदलली आहेत. फुटीच्या राजकारणामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि भाजपचे मी पुन्हा येण्याचे स्वप्न पुर्ण झाले. नुकतंच या नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्ताराचा कार्यक्रम पार पडला आणि शिंदे गटाबरोबरच भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांची मंत्रीपदी वर्णी लागली. अनेक नेते मंत्रिमंडळात गेल्याने भाजपचे काही पदं रिक्त झाले त्यामुळे या पदांवर भाजपने तात्काळ नेमणुका केल्या असून यावेळी आक्रमक नेत्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्षपद चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले असून भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांनी नेमणूक करण्यात आली आहे.

राज्यातील सत्ताबदल आणि मुंबई महानगर पालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरवात केली असून भाजप नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागताच त्यांचे पद रिक्त झाल्याने त्यांच्या जागेवर महत्त्वाच्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्याने त्यांच्या जागी चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष बनले आहेत, तर भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आली आहे.  याआधी भाजप मुंबई अध्यक्षपद मंगलप्रभात लोढा यांच्याकडे होते.

maharashtra-politics-bjp-appointment

 

जाणून घ्या, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी

चंद्रशेखर बावनकुळे यांची आता नवे भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून वर्णी झाली आहे. फडणवीस सरकारच्या काळात बावनकुळे यांच्याकडे ऊर्जा मंत्रिपद होते. डिसेंबर 2014 मध्ये नागपूरचे पालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. नागपुरच्या  कामठी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी त्यावेळी केले. 2004, 2009, 2014 असे सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते.

हे सुद्धा वाचा

Egg Prices :अंडी दर घसरल्याने कुक्कुटपालन व्यवसायाचे नुकसान

BMC : प्रवेश नाकारणा-या शाळांकडे मुंबई महानगपालिकेचे सपशेल दुर्लक्ष

Eknath Shinde : एकनाथ शिंदेनी आधी घेतलेला निर्णय मुख्यमंत्री झाल्यावर बदलला

दरम्यानच्या काळात बावनकुळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले, त्यामुळे 2019 साली भाजपने विधानसभा निवडणुकीचे तिकीट बावनकुळे यांना दिलेच नाही. यानंतर त्यांची पत्नी ज्योती यांनी कामठी विधानसभेतूनच निवडणुकीचा फाॅर्म भरला परंतु शेवटच्या क्षणी भाजपने एबी फॉर्म नाकारला. भाजपच्या या निर्णयाने बावनकुळेंना पाठींबा देणारा तेली समाज संतापला. दरम्यान चंद्रकांत बावनकुळे यांच्या नेतृत्वाचा विचार करून भाजपने त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद दिले आहे.

जाणून घ्या, आशिष शेलार यांच्याविषयी

भाजपमधील आक्रमक नेते म्हणून आशिष शेलार यांची ओळख आहे. रोखठोक भूमिका मांडून त्यावर मत व्यक्त करणारे आशिष शेलार यांना येत्या महापालिका निवडणुकीच्या अनुशंघाने भाजपने मुंबई अध्यक्षपद देऊन मोठी कामगिरी सोपवली आहे. आशिष शेलार सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातून 26 हजार 911 मताधिक्याने विजयी झाले तर सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांंदा 26,550 मताधिक्य राखून विजयी झाले आहेत.

मुंबई भाजपाचे अध्यक्ष म्हणून सन 2013 पासून दोन टर्म ( सात वर्षे) काम करुन त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. विविध उपक्रम, आंदोलने आणि सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारे असल्याने भाजपातील एक सर्व समावेशक आणि आक्रमक नेतृत्व अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेप्रमाणे सबका साथ सबका विकास या धोरणाने पक्ष संघटन मजबूत करण्यात त्यांना यश आले

मुस्लिम, ख्रिश्चन अशा अल्पसंख्याक समाज घटकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवून त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न केले असून त्यातून एक सर्वसमावेशक व आश्वासक नेतृत्व म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे कोविड काळात विधिमंडळाचे अधिवेशन होत नव्हेते त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्राचा दौरा करुन त्यांनी भाजपाचे आमदार, खासदारांच्या वैयक्तीक भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, प्रश्न समजून घेऊन पक्षाकडे त्याचा अहवाल सादर करण्यात त्यांना यश आले आहे, त्यामुळे मुंबई अध्यक्षपदासाठी केलेली निवडणूक सगळ्याच अर्थाने भाजपला फायदेशीर ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी