उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. अतिरिक्त ‘वर्कलोड’मुळे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कूचकामी ठरत असल्याची टीका अंधारे यांनी केली आहे. तसेच फडणवीस यांच्यापेक्षा बच्चू कडू गृहमंत्री पद चांगल्या पद्धतीने संभाळतील असे म्हंटले आहे. बच्चू कडूंसारखे अनेक जण काम करण्यास इच्छुक आहेत. कडूंवर अन्याय होत असून त्यांना संधी देण्यात यावी, असा सल्लादेखील त्यांनी दिला. (Make Bachchu Kadu Home Minister rather than ineffective Fadnavis)
अकोल्यात प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या. राज्यात राजकीय नेत्यांवरील हल्ल्याच्या घटनांमागे वाढ झाली असल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यांनी जबाबदारीचे वाटप करावे. त्यांच्याकडील अनेक आमदार संधीच्या शोधात आहेत. बच्चू कडू देखील गृहमंत्री म्हणून चांगले काम करू शकतील. मात्र, त्यांच्यावर अन्याय केला जात आहे, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे.
फडणवीसांचे अकोल्याकडे दुर्लक्ष
देवेंद्र फडणवीस अकोल्याचे पालकमंत्री आहेत. मात्र, त्यांचे अकोल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे. एकदा नियोजित समितीची बैठक घेयल्यानंतर ते जिल्ह्याकडे फिरकलेदेखील नाहीत, असे अंधारे म्हणाल्या. हक्कभंग समितीवर अंधारे यांनी तोंडसुख घेतले आहे. त्या म्हणाल्या, हक्कभंग समितीचा घोळ काही लक्षात येत नाही. हक्कभंगाचा प्रस्ताव आपल्याकडे कलम १०४ किंवा १९४ नुसार दोन्ही मंडळाकडे सादर केला जातो.” राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पदावर असताना अनेकदा महापुरुषांचा अपमान केला आहे. त्या अनुषंगाने अंधारे यांनी भाजपच्या दुट्टपी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्या म्हणाल्या की, “भारतीय जनता पक्षातील काही नेते जेव्हा महापुरुषांबद्दल अपशब्द काढतात, त्यावेळी ते हक्कभंग का आणत नाहीत?”
हे सुद्धा वाचा
संजय राऊतांना परिणाम भोगावे लागतील; अब्दुल सत्तारांचा इशारा
उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचा ५०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड करणार; सोमय्यांचा पुन्हा इशारा
IAS Transfer : आयएएस डॉ. निधी पांडे यांची अमरावती विभागीय आयुक्तपदी बदली