28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयमालेगावात अद्वय हिरेंनी करुन दाखवलं; बाजार समितीत दादा भुसेंच्या पॅनलची धूळधाण

मालेगावात अद्वय हिरेंनी करुन दाखवलं; बाजार समितीत दादा भुसेंच्या पॅनलची धूळधाण

शिवसेनेत फुट पडल्यानंतर अनेकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. मंत्री दादा भुसे यांनी देखील शिंदे गटासोबत सख्य केले. मात्र त्याच वेळी डॉ. अद्वय हिरे यांनी भाजपला रामराम ठोकत ठाकरेंच्या हस्ते शिवंबधन बांधले आणि ठाकरेंना दादा भुसेंसाठी तगडा प्रतिस्पर्धी मिळाला. त्याचा प्रत्यय देखील मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत आला. भुसे यांची पंधरा वर्षांच्या सत्तेला अद्वय हिरेंनी सुरुंग लावला.

राज्यात आज कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. कारण गेली 15 वर्षे दादा भुसे यांचा येथे वरचश्मा राहिला आहे. दादा भुसे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी सख्य केल्यानंतर ठाकरे गटाला येथे भुसेंच्या विरोधात नव्या नेतृत्वाची गरज होती. त्यांच्या विरोधात अद्वय हिरे यांची तोफ आज धडाडली. बाजार समितीच्या निवडणुकीत 11 जागांपैकी 10 जागांवर हिरे यांनी आपले उमेद्वार निवडून आणले. उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी हा मोठा विजय मानला जात आहे.

शिंदे गटाला नमवून अद्वय हिरे यांनी येथे आता पुढील राजकारणाची नवी इनिंग सुरु केली आहे. भाजपमध्ये हिरे यांना संधी दिली जात नसल्याचे बोलले जात होते. ठाकरे गटातून हिरे यांना भुसेंच्या विरोधात ताकद दिली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने हिरे यांच्यासाठी हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे.

राज्याचे लक्ष लागलेल्या मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत जाहीर झालेल्या पहिल्या अकरा जागांपैकी दहा जागा जिंकून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांनी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यावर मात केली. शिंदे गटाला हा जबर धक्का मानला जातो. भुसे यांची १५ वर्षे या समितीत सत्ता होती. हिरे यांच्या विजयामुळे एकनाथ शिंदे गटाला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.

हे सुद्धा वाचा

मॉरिशसमध्ये महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण; महाराष्ट्र भवनाबाबत फडणवीसांनी केली मोठी घोषणा

80 अधिक गुन्हे असलेल्या बृजभूषणांवर ‘पोक्सो’ चा गुन्हा दाखल; तुरूंगात टाकण्याची कुस्तिगिरांची मागणी

आम आदमी पक्षाचं उद्या आत्मक्लेश आंदोलन ,२०० कार्यकर्ते दिवसभर मैदानात बसणार

बाजार समितीच्या अद्वय हिरे पॅनेलचे विजयी उमेदवार- सर्वसाधारण गटातून डॉ. अद्वय हिरे, सुभाष सुर्यवंशी, रविंद्र मोरे, विनोद चव्हाण, संदिप पवार, राजेंद्र पवार, उज्जैन इंगळे. तर एन.टी. गटातमधून नंदलाल शिरोळे निवडून आले आहेत. महिला राखीव गटात मिनाक्षी देवरे, भारती बोरसे निवडून आल्या आहेत.
दादा भुसे यांच्या पॅनलचे विजयी उमेदवार – पॅनेलचे सोसायटी विभागातून इतर मागास वर्ग गटातील चंद्रकांत धर्मा शेवाळे विजयी.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी